मुंबई : रणबीर - आलियाच्या नात्यावरून पुन्हा एकदा चर्चेत आलेली कतरिना. रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला त्यांच्या नात्याबद्दल नेमकं काय वाटतं? ती या सगळ्याकडे कशी पाहते अशी चर्चा रंगलेली असताना कतरिना काय केलं की आनंद मिळतो याचा देखील तिने खुलासा केला आहे. कतरिना कैफच्या आयुष्यात रणबीरच्या या निर्णयामुळे काही परिणाम झाला आहे का? अशी चर्चा रंगलेली असताना कतरिनाने केलेला खुलासा हा अतिशय सुखद धक्का देणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना म्हणते की, तिला जेवण हे अधिक आनंद देत असतो. जेवण करणं मला अतिशय आवडतं. चांगल्या जेवणाशिवाय दुसरं सुंदर काहीच असू शकत नाही. द टाइम्स ऑफ इंडियाचे फ्लर्टविथ योरसिटी या अभियानांतर्गत कतरिना दिल्ली, मुंबई, चैन्नई आणि बंगलुरूमध्ये आपली खाद्य आवड शेअर केली आहे. जेव्हा मुंबई आणि दिल्लीची गोष्ट येते तेव्हा कतरिना स्ट्रीट फूडला अधिक पसंती देते. 


कतरिना म्हणते की, ती स्ट्रीट फूडला अधिक पसंत करते. दिल्लीत अनेक पर्याय आहेत, बंगाली मार्केट, कबाब ते अगदी चांदनी चौकच्या पराठ्यापर्यंत ती सगळ्यांची आठवण करते. कतरिना कितीही स्ट्रीट फूडला पसंत करत असली तरीही ती फिटनेसची खूप काळजी घेते. ती दररोज व्यायाम करते. असं म्हटलं जातंय की, कतरिना लवकरच "ठग्स ऑफ हिंदोस्तान" या आमीर खानच्या सिनेमांत दिसणार आहे.