FIR च्या चर्चेनंतर vicky kaushal ला katrina kaif ने केलं अलविदा
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर कतरिना अनेकदा पापाराझींसमोर विकी कौशलवर आपले प्रेम व्यक्त करताना दिसते. विकी आणि कतरिना नुकतेच नवीन वर्ष एकत्र साजरे केल्यानंतर विमानतळावर एकत्र दिसले.
नवीन वर्ष साजरे करून विकी कौशल कामावर परतला. विकी आणि कतरिनाच्या लग्नापासूनच चाहते दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
दोघांनी त्यांचे नवीन वर्ष एकत्र साजरे केले आणि आता ते त्यांच्या कामावर परतले आहेत. सेलिब्रेशननंतर जेव्हा कतरिना विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी विमानतळावर आली, तेव्हा दोघेचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विकी आणि कतरिना विमानतळावर दिसले
कतरिना विकी कौशलला विमानतळावर ड्रॉप करण्यासाठी आली होती. मोठ्या प्रेमाने कतरिनाने विकीला मिठी मारली आणि निरोप घेतला. विकी कारमधून उतरण्यापूर्वी कतरिना कैफने त्याला मिठी मारली आणि विकी निघून गेला. विकीने डेनिम जीन्ससोबत तपकिरी रंगाचा स्वेटशर्ट घातला होता.
सारा अली खानसोबत विकी कौशल दिसणार
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विकी कौशल रोमँटिक कॉमेडी चित्रपटात सारा अली खानसोबत दिसणार आहे. सारा आणि विकी इंदौरमध्ये 30 ते 40 दिवस शूटिंग करणार आहेत. याशिवाय विकी 'गोविंदा नाम मेरा'मध्ये भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
विकीवर गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकी कौशलने स्कुटी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विकी कौशलवर पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आलाय.
पोलिसांनी गुन्हा नोंदवला
एनआयए या वृत्तसंस्थेनुसार, तक्रारदार जयसिंग यादव यांनी सांगितले की, चित्रपटाच्या एका दृश्यात वापरलेली स्कुटी माझी आहे. कारण माझ्या वाहनाचा क्रमांक तोच आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण हे बेकायदेशीर आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्या परवानगीशिवाय ते बाईकचा नंबर वापरू शकत नाहीत. मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारवाई करावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता नुकतंच लग्न झालेला अभिनेता विकी कौशलच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.