मुंबई : प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडिलांची जागा कोणी दुसरा व्यक्ती घेवू शकत नाही. मुलीच्या लग्नात बाप सर्वांसमोर आनंदी राहण्याचा देखावा करतो. पण आपली मुलगी आता आपल्यापासून दूर जाणार हिचं एक गोष्ट प्रत्येक वडिलांना दुःख देत असते. नुकताचं अभिनेत्री कतरिना कैफ लग्न बेडीत अडकली. कतरिनाच्या लग्नात तिचं संपूर्ण कुटुंब सोबत होतं. पण तिचे वडील तिच्या सोबत नव्हते. कतरिना लहान होती तेव्हाचं तिच्या आई-वडिलांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करतरिनाला तिच्या लग्नात वडिलांची कमतरता भासलीचं असेल. पण लग्नात अभिनेता विकी कौशल आणि कतरिनाचे सासरे शाम कौशल यांनी पूर्ण केली. सध्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक फोटोंमध्ये ती सासऱ्यांसोबत दिसत आहे. 



विकी-कतरिनाच्या लग्न, हळदीच्या फोटोंनंतर दोघांनी मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कतरिना सासऱ्यांसोबत ठेका धरताना दिसत आहे. कतरिना कैफचं सासऱ्यासोबतचं बॉण्डिंग पाहुन तुम्हीही क्या जोडी है ! असं म्हणाल. लग्नापूर्वी कतरिनाने एका मुलाखतीत वडील आपल्यासोबत नसल्याचं दुःख व्यक्त केलं. 


'आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर वडिलांची गरज असते. लहान असताना आई-वडील विभक्त झाल्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. माझ्या मुलांना मी आई-वडील दोघांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करेल. ' असं देखील कतरिना म्हणाली होती.