मुंबई : बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. लग्नानंतर जेव्हा कतरिना कैफ तिच्या हनिमूननंतर पहिल्यांदा मुंबईत परतली, तेव्हा तिने पीच आणि गोल्डन रंगाचा सलवार परिधान केला होता. हातात बांगड्या घालून आणि सिंदूर लावून मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या ब्रेल लूकने कतरिनाने सगळ्यांची मनं जिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफला नेहमीच भारतीय पारंपरिक लूक आणि कपडे आवडतात. लग्नाआधीही कतरिना कैफ अनेकदा सुंदर सूटमध्ये दिसली होती. कतरिना कैफच्या लग्नाआधीचे लूक्स पाहता, ती लग्नानंतर तिच्या सासरच्या घरीही तितकीच सुंदर दिसत आहे असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कतरिना कैफचा लग्नासाठी जयपूरला जातानाचा लूकदेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.



या पिवळ्या सूटमधील कतरिना कैफच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यासोबतच कतरिना कैफ सलवार सूटमध्ये याआधीही सगळ्या कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये दिसली होती. फोटो पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होतं आहे की, कतरिना कैफचं सौंदर्य पारंपारिक लूक आणि सूटमध्ये अनेक पटींनी वाढतं.