मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. लग्नासाठी सोमवारी विकी आणि कतरिना कुटुंबासोबत जयपूरला रवाना झाले. त्यामुळे येत्या 9 तारखेला विकी आणि कतरिना सप्तपदी घेणार यात काही शंकाचं नाही. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये विवाह संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यात फक्त 120 जणांची उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  फिटनेस फ्रिक अभिनेत्री कतरिन लग्नातील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेणार आहे. लग्नासंदर्भात अनेक गोष्टी हळू-हळू समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे लग्नातील तोंडाला पाणी आणणारे अनेक पदार्थ. लग्नात पाहुण्याच्या जीभेचे चोचले पुरवले जाणार आहेत.  


रविवारी 100 हून अधिक मिठाई विक्रेते सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यासाठी खास बुक केलेल्या धर्मशाळेत ते राहणार आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, पाहुण्यांना सर्व प्रकारचे पदार्थ चाखण्याची संधी मिळावी यासाठी एक खास मेनू सेट करण्यात आला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातून ताज्या भाज्या मागवण्यात आल्या आहेत. तर काही भाज्या आणि फळे परदेशातून देखील  मागवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये  थायलंडमधील मशरूम आणि फिलिपाइन्समधील एवोकॅडो यांचा समावेश आहे. 


विकी पंजाबी कुटुंबातील असून त्याला खाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे पारंपरिक पंजाबी थाळीपासून छोले भटुरे आणि बटर चिकनचाही मेनूमध्ये समावेश करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पाहुण्यांना पेरिपेरी पनीर, टॉर्टिला वेफर्स, पालक कॉर्न, ब्रोकोली सॅलड, टोफू सॅलड यांसारख्या आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. विकी-कतरिनाच्या लग्नात पाहुण्यांना चविष्ट  पदार्थांचा आस्वद घेता येणार आहे. 


आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसोबत लग्नात देसी तडका देखील असेल. राजस्थानची प्रसिद्ध केर संगरी भाजी, दाल-बाटी आणि चुरमाही पाहुण्यांना देण्यात येणार आहे. विकी-कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन 7 ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे.