BIRTHDAY SPECIAL:कतरिनावर बॉलिवूडमधून बाहेर पडण्याची वेळ आली होती, पण...
कतरिना कैफने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या क्यूट आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाच्या तर चाहते प्रेमात आहेतच, पण तिच्या स्टाईलिंगची देखील तितकीच चर्चा पाहायला मिळते. आज बॉलिवूडच्या शिलाचा 38 वा वाढदिवस आहे. कतरिनाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
पण एक वेळ अशी होती की तिने आपलं बॉलिवूडमधील करिअर संपवण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नव्हे तर अभिनय सोडून इतर क्षेत्रात काम करण्याचं ही तिने ठरवलं होतं.
कतरिना कैफने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. 'नमस्ते लंडन' या सिनेमाच्या रिलीजनंतर कतरिनाने हे पाऊल उचलण्याबाबत ठरवलं होतं. कतरिना कैफ आणि अक्षय कूमार यांनी सुरुवातीच्या काळात एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
दोघांची ऑन स्क्रिन जोडी खूपच चर्चेत आली होती. पण नमस्ते लंडन या सिनेमाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमाला प्रेक्षकांचा निगेटीव्ह प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कतरिना आता आपलं करिअर धोक्यात आल्याचं वाटू लागलं.
करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये कतरिनाने हा किस्सा सांगितला होता. सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून कतरिनाची ओळख आहे. पण करिअरच्या सुरुवातीला कतरिनाला देखील चढ-उतारांचा सामना करावा लागला असल्याचं तिने यावेळी सांगितलं.