`ही` महिला ठरली केबीसी-९ ची पहिली करोडपती
टीआरपीत अव्वल असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनला पहिली करोडपती महिला मिळाली आहे.
नवी दिल्ली : टीआरपीत अव्वल असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनला पहिली करोडपती महिला मिळाली आहे.
अभिनेता अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या केबीसी या शोमध्ये एका महिलेने एक कोटींची रक्कम जिंकली आहे. या महिलेचं नाव अनामिका असं असल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही विजेता महिला झारखंडमधील निवासी असून त्या एक समाजसेविका आहेत. फेथ इन इंडिया नावाचं एक एनजीओ त्या चालवतात.
या एपिसोडचं शूटींग गोरेगाव फिल्मसिटीमध्ये करण्यात आलं आहे. अनामिका प्रश्नांची उत्तरं देत शोची सर्वाधिक रक्कम असलेल्या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचली होती. मात्र, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तिला माहित नसल्याने तीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती १ कोटी रुपयांवर तिला समाधान मानावं लागलं.
जिंकलेल्या १ कोटी रुपयांचं काय करणार? या प्रश्नावर उत्तर देताना अनामिका यांनी सांगितलं की, या पैशांचा उपयोग आपल्या एनजीओच्या कामांसाठी करणार. हे एनजीओ ग्रामीण भागातील नागरिकांसाठी काम करतं.