मुंबई : 'कोन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. आतापर्यंत या कार्यक्रमामुळे अनेकांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलंय. या कार्यक्रमामुळे अनेकांना सेलिब्रेटी स्टेटस प्राप्त झालं. मात्र मोजकेच असे असतात ज्यांना मोठी रक्कम जिंकता येते. सर्वांनाच कोट्यधीश होत येत नसलं तरी बरेच प्रतिस्पर्धी हे बऱ्यापैकी रक्कम जिंकतात. केबीसीच्या 13 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही 'बिग बी' अमिताभ बच्चन (Kaun Banega Crorepati) होस्ट करत आहेत. बुधवारी या कार्यक्रमाचा एपिसोड पार पडला. या  भागात स्वाती श्रीलेखा (Swati Sreelekha) सहभागी झाल्या होत्या. त्यांनी 10 प्रश्नांची अचूक उत्तर देत 3 लाख 20 हजार रुपये निश्चित केले. (Kaun Banega Crorepati Season 13th Swati Srilekha quits the game on question of Rs 12 lakh 50 thousand based on Ramayana do yo know answer)
 
12 व्या प्रश्नावर माघार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर स्वाती यांनी लाईफलाईनचा वापर करत 11 व्या प्रश्नाचंही अचूक उत्तर दिलं. यासह त्यांनी 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. आता वेळ होती 12 व्या प्रश्नाची. सलग 11प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्वाती यांची गाडी 12 व्या प्रश्नावर अडकली. 12 वा प्रश्न 12 लाख 50 हजारांचा असतो. त्यांना या प्रश्नाचं उत्तरही माहित नव्हतं, तसेच त्यांच्याकडे लाईफलाईनही नव्हती. त्यामुळे नाईलाज म्हणून त्यांना माघार घ्यावी लागली.


कार्यक्रमाच्या नियमांनुसार स्पर्धकाने माघार जाहीर केल्यानंतर, त्या संबंधित प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. त्यानुसार स्वाती यांनी 4 पर्यांयापैकी 1 पर्याय निवडला. मात्र स्वाती यांनी माघार घेण्याआधी तो पर्याय निवडला असता, तर त्यांना जिंकलेली रक्कम गमवावी लागली असती. त्यामुळे त्यांचा खेळातून माघार घेण्याचा निर्णय योग्य ठरला.


प्रश्न काय होता?  


वाल्मिीकि रामायणानुसार, कपिल ऋषींनी अग्निने कोणत्या राजाच्या 60 हजार पुत्रांना भस्म केलं होतं, असा प्रश्न 12 लाख 50 हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता.  


विचारलेल्या प्रश्नाचे चार पर्याय...


सगर
त्रिशंकु
विस्वमित्र
भगीरथ


योग्य उत्तर काय? 


या प्रश्नाचं अचूक उत्तर सगर असं होतं. मात्र स्वातीने या प्रश्नाचं उत्तर हे 'त्रिशंकू' असं दिलं होतं. मात्र योग्य उत्तर माहित नसल्याने स्वाती यांनी वेळ न दवडता चटकन माघार घेण्याचा निर्णय घेतला. स्वाती या अविवाहित असून त्या शिक्षिका आहेत.