मुंबई : कौन बनेगा करोडपती (KBC), या रिअॅलिटी शोच्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये गीता सिंह गौर या महिलेनं कमालच केली होती. खेळात त्यांनी फक्त एक कोटी रुपयेच जिंकले नाहीत, तर त्यांनी 7 कोटी रुपयांसाठीच्या जॅकपॉट प्रश्नांचाही सामना केला. पण, या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसल्यामुळे त्यांनी हा खेळ मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हालाही प्रश्न पडतोय ना, की केबीसीमध्ये 1 कोटी रुपयांसाठी नेमका किती कठीण प्रश्न विचारला जातो? चला तर मग नजर टाकूया या शोमध्ये विचारलेल्या अशा प्रश्नांवर ज्यांची उत्तरं देऊन स्पर्धकांना 7 कोटी रुपये जिंकता आले असते. 


गीता यांना विचारण्यात आलेला प्रश्न... 
प्रश्न- यापैकी कोणतं नाव अकबरच्या नातवंडांपैकी एक नाहीये ज्यांना जेशुईट पादरींना सोपवण्यात आल्यानंतर हे बनवण्यात आलं होतं? 
a. डॉन फेलिपे
b. डॉन हरिके
c. डॉन कार्लोस
d. डॉन फ्रांसिस्को


योग्य उत्तर -  डॉन फ्रांसिस्को


सनोज कुमार यांना विचारण्यात आलेला प्रश्न 
प्रश्न - ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाच्या चेंडूवर 1 धाव काढत आपलं शंभरावं शतक पूर्ण केलं होतं? 
a. बका जिलानी
b. सी रंगाचारी
c. गोगुमल किशनचंद
d. कंवर राय सिंह


योग्य उत्तर- गोगुमल किशनचंद



बबीता ताड़े यांना विचारण्यात आलेला प्रश्न 
यापैकी कोणत्या राज्याचे सर्वात जास्त राज्यपाल पुढे भारताचे राष्ट्रपती झाले? 
a. राजस्थान
b. बिहार
c. पंजाब
d. आंध्र प्रदेश


योग्य उत्तर - बिहार


पाचन तंत्र असणारा असा एकमेव पक्षी कोण आहे जो, गोजातीय रुपात वनस्पतीला किण्वित करतो आणि विशेषत: पानं आणि कळ्या खाण्यात सक्षम आहे? 
a. शोबिल सारस
b. होत्ज़िना
c. फावड़ा
d. गॅलापागोस जलकाग


योग्य उत्तर - होत्जिन होट्जिन