मुंबई : F.I.R. या छोट्या परद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक परत चर्चेत आली आहे. तिने सलमान खानच्या बिग बॉस या शोबद्दल जे काही व्यक्त केलं आहे त्यानंतर बिग बॉस चाहते नाराज झाले आहेत. रियलिटी शो असलेला या बिग बॉस सिझन 14 मध्ये अभिनेत्री कविता कौशिक झळकली होती. हो, आपल्या हेच म्हणावं लागेल की झळकली होती. कारण तिला अचानक या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसमध्ये कविताची एन्ट्री वाइल्ड कार्डमधून झाली होती. या शोदरम्यान एजाज खानसोबत तिचं भांडण खूप गाजलं होतं. काही वेळानंतर तिला बिग बॉसचं घर सोडून घरी जावं लागलं. पण ती लवकरच बिग बॉसच्या घरात परत आली. मात्र यावेळी रुबीना दिलाइक आणि अभिनव शुक्लासोबत झालेल्या बाचाबाचीत शोच्या मेकर्सनेच कविताला शो सोडण्यास सांगितला.


'ते' माझ्या आयुष्यातील खराब दिवस


कविता कौशिकला बिग बॉसमधील अनुभव माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात खराब अनुभव होता. मी आजही कधी - कधी ते दिवस आठवले तर मला आजारीपणाची भावना येते. अगदी उलटी आल्यासारखं वाटतं. कविताने यापूर्वी बिग बॉस शोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  


रुबीना दिलाइकने बिग बॉस 14 जिंकल्यावर कविताच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर कविताला हा शो करायला नको होता, असं म्हटलं. यावर कविताने या चाहत्याला उत्तरही दिलं. ती म्हणाली, ''हे बरोबर आहे, कारण जेव्हा तुम्ही इतरांसमोर असलेली तुमची इमेज खराब करता, त्यानंतर तुम्ही काहीही करण्यासाठी मोकळे असता. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल मी विचार करत नाही. खोट्या रिएलीटी शोमध्ये जज म्हणून काम करतात, ती लोकं मला आवडत नाहीत.''



कविता आता ओटीटी


कविताने ओटीटीवर डेब्यू केलं आहे. क्राइम थ्रिलर 'तेरा छलावा' यात कविताने काम केलं आहे. या सीरीजमधील एपिसोडचे वेगवेगळे डायरेक्टर असून ही सीरीज प्रीमियर हंगामा प्लेवर 7 जुलैला प्रदर्शित झाली आहे.