KBC 10 : एअरफोर्सची रिटायर्ड महिला ऑफिसरने जिंकले 12.50 लाख रुपये
केबीसी सिझन 10
मुंबई : टीव्हीतील सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' चं सिझन 10 सुरू होत आहे. या शोची पहिली विजेती आहे सोनिया यादव. जिने या कार्यक्रमात 12 लाख 50 हजार रुपये जिंकले आहेत. हरियाणाची सोनिया यादव पहिली स्पर्धक शोच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये पोहोचली आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धकांमध्ये देखील सोनिया यांनी पहिल उत्तर दिलं होतं. आर्मी बँकग्राऊंड असलेली सोनिया एरोनॉटिकल इंजीनिअर आहे. सोनिया 25 लाखाचं उत्तर देऊ शकली नाही त्यामुळे ती 12 लाख 50 हजार जिंकली.
शोचे लोकप्रिय होस्ट मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी केबीसी सिझन 10 मध्ये खूप चांगले बदल केले आहे. या शोमध्ये आता सिनेमांच प्रमोशन केलं जाणार नाही. तसेच 'केबीसी कर्मवीर' सेग्मेंट सुरू केलं आहे. हा एपिसोड शुक्रवारी प्रसारित केल जाणार आहे.
भारतातील पहिला क्विज रिअॅलिटी शो 3 जुलै 2000 मध्ये पहिल्यांदा कौन बनेगा करोडपती शो सुरू झाला. भारतातील हा पहिली रिअॅलिटी क्विज शो आहे जो घराघरात पोहोचला. कौन बनेगा करोडपतीचे आतापर्यंत 9 सिझन झाले असून 10 व्या सिझनची सुरूवात 3 सप्टेंबरपासून सुरू झालं आहे.