मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या रुपेरी पडद्यावरचा वावर कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. चित्रपटांच्या निमित्तानं त्यांनी अनेक मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत. त्यातच नीना गुप्ता (Neena Gupta) या त्यांच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत राहिल्या. आय़ुष्यातील चढ-उतार त्यांनी कायमच चाहत्यापुढे मांडले. अशा या दिलखुलास अभिनेत्रीमुळं एकीला तिची स्वप्न साकार करण्यासाठी मोलाचा हातभार लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांची स्वप्न साकार करणाऱ्या आणि त्या स्वप्नांना बळ देणाऱ्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 


केबीसीच्या (KBC13) नव्या पर्वातील पहिल्या भागात झारखंडमधील शालेय शिक्षक ज्ञान राज हे 20 लाख रुपये जिंकून ते घरी परतले. यानंतर पशुवैद्यक नेटा बाटला हॉट सीटवर आल्या. ज्यानंतर नव्या भागाची सुरुवात नेहा बाटला यांच्यापासूनच झाली. त्याचवेळी समोर बसलेल्या स्पर्धकाला बिग बींनी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी संबंधित एक प्रश्न विचारला. 


2021 मध्ये प्रकाशित झालेल्या नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर देत नेहा बाटला यांनी 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. सच कहूँ तो असं नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचं नाव आहे. नेहा यांना या प्रश्नाचं उत्तर देणं जमलं, पण पुढे मात्र 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नावर त्यांनी या कार्यक्रमातून माघार घेतली. 


सासऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चढल्या KBC ची पायरी 
नेहा यांनी आपण सासऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कार्यक्रमात आल्याचं सांगितलं. आपल्याला मिळालेली रक्कम ही सन्मानच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पशुवैद्यकांनाही समाजात मानाचं स्थान मिळावं यासाठी त्या आग्रही दिसल्या.