मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC 13) या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिग बी अमिताभ बच्चन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या अनोख्या अंदाजासोबतच त्यांच्या स्टाईल स्टेमेंटसाठीही ओळखले जातात. देवीय़ों और सज्जनो, मै अमिताभ बच्चन आप सभी का स्वागत करता हूँ, असं भारदस्त आवाज म्हणत प्रेक्षकांचं स्वागत करणाऱ्या या अभिनेत्याच्या रुपात भर टाकण्यास एक मराठमोळी मुलगी कारणीभूत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी आहे, प्रिया पाटील. प्रिया केबीसीसाठी बिग बींचा लूक अर्थात त्यांचा पेहराव डिझाईन करत आहे. त्यांच्या लूकला वेगळा टच देण्यासाठी तिनं यंदाच्या वर्षी टाय बो अॅक्सेसरीचा वापर केल्याचं एका मुलाखतीत सांगितलं. यासोबतच आणखी एक खास टचही त्यांच्या कपड्यांमध्ये पाहता येणार आहे. 


प्रियानं दिलेल्या माहितीनुसार, केबीसीच्या नव्या पर्वासाठी तिनं बिग बींच्या शर्टच्या कफलिंगवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं नाव दिसू शकेल अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळं विविध रंगांच्या सूटमध्ये बिग बीं पेहरावाला यावेळी त्यांच्या कुटुंबियांचीही अनोखी साथ असणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


बिग बींचा बॉडीगार्ड अडचणीत, Income नं वाढवला ताप


 


बिग बींचंही योगदान... 
संपूर्ण लूकमध्ये एक गोष्ट अशी असते जी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) स्वत:च्या आवडीनिवडीनं वापरतात. ही गोष्ट म्हणजे, पायमोजे. आपल्या लूकला परिपूर्ण करणारे शूज किंवा फूटवेअर निवडल्यांतर त्यावर साजेसे मोजे ते स्वत:चे स्वत: निवडतात. ही बाब आणि ही संपूर्ण प्रक्रिया खुप मजेशीर असते असंही प्रियानं सांगितलं आहे. 


आतापर्यंत बच्चन यांच्याकडून कोणती अविस्मरणीय प्रतिक्रिया मिळाली आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी शब्दांच्या वाटे माझ्या कामाची प्रशंसा करण्यापेक्षा ते माझे डिझान केलेले कपडे वापरतात हीच माझ्या कामाची पोचपावती आहे अशा शब्दांत तिनं आनंद व्य़क्त केला.