बिग बींचा बॉडीगार्ड अडचणीत, Income नं वाढवला ताप

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. दरम्यान प्रत्येक चित्रपट निर्माता आणि कलाकार त्यांचा आदर करतात. 

Updated: Aug 27, 2021, 01:55 PM IST
बिग बींचा बॉडीगार्ड अडचणीत, Income नं वाढवला ताप title=
मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. दरम्यान प्रत्येक चित्रपट निर्माता आणि कलाकार त्यांचा आदर करतात. अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोविंग कोटींमध्ये आहे. ते जिथे जातात तिथे असंख्य लोक फक्त त्यांची एक झलक पाहण्यासाठी जमा होतात. अशा परिस्थितीत तुम्ही समजू शकता की, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणं किती मोठं आव्हान असेल?
 
त्यासाठी त्यांचा सुरक्षारक्षक बिग बींसोबत सावलीसारखे जवळ असतो.बहुतेक फोटोंमध्ये जितेंद्र अमिताभ बच्चन यांच्या मागे किंवा जवळ उभे असल्याचं तुम्हाला दिसेल. सार्वजनिक कार्यक्रमांपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटपर्यंत, अमिताभ बच्चन जिथे जातात तिथे जितेंद्र त्यांच्यासोबत जितेंद्र सावलीप्रमाणे असतो. अहवालानुसार, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा सांभाळण्यासाठी जितेंद्र वार्षिक 1.5 कोटी रुपये पगार घेतो. म्हणजेच, दरमहा त्याला सुमारे 12,50,000 / -रुपये पगार मिळतो.
 
पण आता या उत्पन्नाच्या चर्चेमुळे तो अडचणीत आल्याचं बोललं जात आहे, कोटींच उत्पन्न घेणाऱ्या बिग बींच्या बॉडीगार्डची बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या  जितेंद्र शिंदे यांना अमिताभ यांचा सुरक्षारक्षक म्हणून 2015 मध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.
 
पण कमाईच्या चर्चेनंतर पोलिस आयुक्तांकडून बदलीचे आदेश देण्यात आले आहेत . सोबतच शिंदेंच्या उत्पन्नाबाबत देखील चौकशी केली जाणार आहे. जितेंद्र शिंदेंच्या पत्नीच्या नावे सुरक्षा एजन्सी असल्याची चर्चा आहे.