मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे हे 14 (Kaun Banega Crorepati 40) वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. यावेळी शोमध्ये नागालँडचे डीजीपी रूपिन शर्मा हे हॉट सीटवर आहेत. या एपिसोडमध्ये रुपिन यांनी 12 लाख 50 हजारांच्या प्रश्नावर खेळ थांबवला. त्यावेळी त्या प्रश्नाच उत्तर सांगताना अमिताभ यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांचा एक किस्सा शेअर केला आहे. 


आणखी वाचा : ... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला 'त्या' प्रसंगाचा थरार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अमिताभ यांनी रुपिन शर्मा यांना 12 लाख 50 हजार रुपयांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या युरोपियन शहरातील महापौरांनी 30 मे 2022 रोजी खास ट्रॅम पाठवली होती?’ पोजनन, वारसॉ, व्रोक्लॉ आणि क्रकाऊ हे चार ऑप्शन देण्यात आले होते. लाइफलाइन वापरूनही रुपिन यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचं उत्तर ‘व्रोक्लॉ’ असल्याचं सांगितलं. 


आणखी वाचा : 'रणवीरनं दाखवलं, तुझं काय...?', अर्जुन कपूरच्या बॉयकॉट वक्तव्यावर Bollywood अभिनेत्रीचं Bold वक्तव्य


पुढे या शहराचा आणि त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांचा एक किस्सा अमिताभ यांनी सांगितला. अमिताभ म्हणाले, 'व्रोक्लॉ हे पोलंडमधील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात साहित्याला खूप मान सन्मान मिळतो. व्रोक्लॉ हे शहर ‘एल्फ सिटी’ म्हणूनही ओळखलं जातं. या शहरात जगभरातील गाजलेल्या साहित्यिकांचे पुतळे आहेत.' 


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


पुढे अमिताभ म्हणाले,'दोन वर्षांपूर्वी माझे पुज्यनिय वडील हरिवंश राय बच्चन यांचा पुतळा पोलंडमध्ये उभारण्यात आला. त्याच्या उद्घाटनासाठी आम्हाला तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या 12-15 वर्षांच्या मुलांनी बाबूजींनी 1935 साली लिहिलेली मधुशाला गायली होती.'


आणखी वाचा : किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video


यावेळी अमिताभ यांचे डोळे पाणावले होते. सध्या 'केबीसी'चं 14 वं पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर या पर्वाची बरीच चर्चा सुरू आहे.