... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला `त्या` प्रसंगाचा थरार
पाहा `कौन बनेगा करोडपती`चा प्रोमो...
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे 14 (Kaun Banega Crorepati 14) वे पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करत आहेत. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. यावेळी शोमध्ये नागालँडचे डीजीपी रूपिन शर्मा हे हॉट सीटवर आहेत. रुपिन शर्मा हे तेच आहेत ज्यांनी डॉन अबू सालेमला अटक केली होती. त्याचा किस्सा रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांना, रुपिन शर्मा हे डीजीपी असल्याचं कळलं तेव्हा सुरुवातीला ते थोडे घाबरले. पण नंतर त्यांच्या धाडसाचे कौतुक करत अमिताभ यांनी रुपिन यांचा ऑटोग्राफही घेतला.
याचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ रुपिन यांना बोलतात की, 'तुम्ही एक अतिशय भयानक, वॉन्टेड दहशतवाद्याला अटक केले होते.' समोर आलेल्या प्रोमोमध्ये रुपिन स्वतःबद्दल बोलतात की, 'मी नागालँडमधील डायरेक्टर जनरल ऑफ प्रिझन म्हणून काम करतो'.
यावर उत्तर देत रुपिन म्हणतात, '1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटामागे अबू सालेमचा हात होता. या प्रोमो व्हिडिओमध्ये रुपिनयांचे मित्रही बोलताना दिसले आहेत. यावेळी सगळ्यांनी रुपिन शर्मा यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. हे पाहून अमिताभ म्हणतात, 'सर, लोकांची मनं जिंकणे खूप कठीण आहे. खूप छान सर.' त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी रुपिनचा ऑटोग्राफही घेतला.
2005 मध्ये पोर्तुगालमधून डॉन अबू सालेमला पकडण्यात आयपीएस रुपिन शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. रुपिन हे त्यावेळी सीबीआय टीमचे नेतृत्व करत होते. त्यांनी 2002 मध्ये एका मेलद्वारे अबू सालेमचे पोर्तुगालमधील लोकेशन ट्रेस केले.
याविषयी सांगताना रुपिन म्हणाले, जेव्हा आम्ही या खटल्यावर काम सुरू केले, तेव्हा आम्हाला लगेच यश मिळाले नाही, त्यानंतर आम्ही इतर राज्यांशी बोललो आणि आमचा डेटा अपडेट केला. तेव्हा पासपोर्टची सर्व कागदपत्रे हार्डकॉपीमध्ये होती. त्यामुळे डेटाबेस इतका नव्हता. गुन्हेगारांकडे वेगवेगळे पासपोर्ट आणि प्रत्येक पासपोर्टवर वेगवेगळी नावं असायची. आम्ही 4-5 लोकांची टीम बनवली आणि एका छोट्या लीडवर काम करायला सुरुवात केली. 2002 मध्ये आम्हाला एक ईमेल आला की अबू सालेम तिथे आहे. एक व्यक्तीनं त्यांना सांगितले की अबू सालेम आणि मोनिका बेदी हे दोघे पोर्तुगालला असून लवकरच कॅनडाला जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
पुढे रुपिल म्हणाले, 'जेव्हा आम्ही डेटा ऍक्सेस केला तेव्हा आम्हाला एक लीड मिळाली की मोनिका बेदीचे पालक नॉर्वेचे आहेत. आम्ही ईमेल ट्रेस केला आणि कळले की ते पोर्तुगालमधून आले आहे. आम्ही लगेच तिथल्या सरकारशी संपर्क साधला आणि त्यांना शोध घेण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी सांगितले की त्याला 25 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवणार नाही आणि फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन दिले की तो अबू सालेम आहे. एके दिवशी जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला कळले की त्याला अटक करण्यात आली आहे आणि आम्हीला जो आनंद झाला ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही.'
आणखी वाचा : 'रणवीरनं दाखवलं, तुझं काय...?', अर्जुन कपूरच्या बॉयकॉट वक्तव्यावर Bollywood अभिनेत्रीचं Bold वक्तव्य
एका मुलाखतीत हा शो सतत होस्ट करण्यावर अमिताभ म्हणाले, 'ते लोक प्रत्येक वेळी सेटवर येतात. तेच लोक आहेत ज्यांच्यामुळे मी परत येण्याचं ठरवतो. मी स्टेजवर एण्ट्री करताच ज्या पद्धतीनं ते माझं स्वागत करतात आणि हॉटसीटवर असलेल्या स्पर्धकांना प्रोस्ताहन देतात. मी सतत हा शो करण्यासाठी हिच कारण आहेत.'