KBC 15 Amitabh Bachchan Cried: 'कौन बनेगा करोडपती' शो देशभरात पाहिला जातो. अमिताभ बच्चन आणि या शोचे अतूट नाते आहे. अनेकजण तर अमिताभ यांना भेटण्यासाठी आपण शोची तयारी केल्याचे मान्य करतात. नुकताच याचा 15वा सीझन  संपला आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी प्रसारित झाला. ज्यामध्ये होस्ट अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन 'KBC 15' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये दिसल्या होत्या. शर्मिला टागोर आणि विद्या बालन यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अनेक सुंदर आठवणी आणि रंजक किस्से शेअर केले. पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली. तेव्हा एक दिवस हा सीझन संपणार आहे, हे अमिताभ यांना माहिती होते. मात्र स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या आनंदासमोर आपण ही गोष्ट विसरल्याचे त्यांनी शोमध्ये मान्य केली. अमिताभ 'केबीसी'मधील प्रत्येक स्पर्धकासोबत मजा करताना आणि त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसतात. ते सगळ्यांना खूप हसवतात. पण जेव्हा 'कौन बनेगा करोडपती 15'ला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि ते भावूक झाले.


'आमच्या प्रियजनांना सांगणे कठीण आहे की उद्यापासून आपण इथे येणार नाही...'
अमिताभ भावूक झाले आणि म्हणाले, 'भगिनींनो, आता आम्ही निघतोय. उद्यापासून हा स्टेज सजणार नाही. आपण उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगता येण्यासाठी… ना ते सांगण्याची हिंमत आहे ना सांगावीशी वाटत आहे. मी, अमिताभ बच्चन, या कालावधीसाठी शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे - शुभ रात्री, शुभ रात्री. असं म्हणत अमिताभ यांचा कंठ दाटून आला आणि डोळे भरून आले.



अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. भावूक झालेले अमिताभ सगळ्यांकडे बघत राहिले आणि ऐकत राहिले. एकजण म्हणाला, 'आमच्यापैकी कोणीही देव पाहिला नाही. पण आज आम्ही देवाच्या लाडक्याला पाहत आहोत. 


या चित्रपटांमध्ये दिसणार अमिताभ बच्चन 


नवीन सीझनमध्ये पुन्हा भेटण्याची आशा अमिताभ यांनी व्यक्त केली. अमिताभ लवकरच कल्की 2898 एडी, 'बटरफ्लाय' आणि वेट्टियाँ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. वेट्टायन या चित्रपटातून ते तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.