Amitabh Bachchan KBC Fees : मेगास्टार अमिताभ बच्चन तब्बल 24 वर्षांपासून कौन बनेगा करोडपती होस्ट करत आहेत. या शोने अमिताभ बच्चनचं नशिब पालटलं. दरवर्षी चाहते मोठ्या उत्साहाने रिॲलिटी शोची वाट पाहत असतात. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची सुवर्ण संधी आणि तीदेखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळते. आता लवकरच 16वा सीझन सुरू होणार असून शोच्या नवीन सीझनसाठी नोंदणीही सुरू झालीय. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये अमिताभ बच्चन यांनी या शोसाठी किती मानधन घेत आहे, ते जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझन 2000 मध्ये सुरू झाला होता. त्यावेळी बक्षिसाची रक्कम एक कोटी एवढी होती. तर दुसऱ्या सिझनमध्ये ती 5 कोटी करण्यात आली. मात्र, चौथ्या सिझनमध्ये ही बक्षीस रक्कम पुन्हा एक कोटी झाली. त्यासोबत, एक जॅकपॉट प्रश्न ठेवण्यात आला होता ज्यातून स्पर्धक 5 कोटी रुपये जिंकू शकतात.


सियासतच्या रिपोर्टनुसार, 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या सीझनची सुरुवात अमिताभ बच्चन यांनी केली आणि तेव्हा त्यांनी प्रति एपिसोड 25 लाख रुपय फी घ्यायचे. या सीझनमध्ये अनेक मोठे स्टार्स झळकले आहेत. शाहरुख खान, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर दिसले होते. पण तिसरा सीझन प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बींनी होस्ट न करता शाहरुख खानने होस्ट केला होता. 


रिपोर्टनुसार, पाचव्या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी यांनी एक कोटी रुपये घेत होते. हा हंगाम 2011 मध्ये आला होता. नंतर त्यांची फी वाढवायला सुरुवात झाली. त्यांननी सीझन 6 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 1.5 कोटी रुपये आणि सीझन 7 साठी 2 कोटी रुपये आकारले.


कौन बनेगा करोडपतीचा सीझन 8 खूप गाजला तर प्रत्येक एपिसोडसाठी बिग बींनी 2 कोटी रुपये घेतले होते. तर अमिताभ बच्चन यांनी सीझन 9 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 2.6 कोटी रुपये आकारले. त्यानंतर सीझन 10 साठी प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी यांनी 3 कोटी रुपये घेत होते. तर सीझन 11, 12 आणि 13 मध्ये बिग बींची फी सारखीच होती. एका एपिसोडसाठी त्यांनी साडेतीन कोटी मानधन घेतले होते. 


मग बिग बींनी 14व्या सीझनसाठी मोठी फी आकारली होती. त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 4-5 कोटी रुपये घेतले होते, असं मीडियावर रिपोर्ट सांगण्यात आलंय. कौन बनेगा करोडपती सीझन 15 प्रचंड हिट ठरला होता. तेव्हा पण त्यांनी या 4-5 कोटी घेतले होते. आता 16वा सीझन येतोय. अनेकांना करोडपती बनवणारे अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच करोडपती झाले आहेत.