मुंबई : रिअॅलिटी शोच्या यादीमध्ये कित्येक वर्षांपासून चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या 'कौन बनेगा करोड़पती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाला आता आणखी लोकप्रियता मिळाली आहे. सध्या हा कार्यक्रम 13 वर्षांचा प्रवास पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाच्या 13 व्या पर्वाची सुरुवात झाली. 2000 या वर्षात सुरु झालेल्या या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी, पहिलावहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता,  हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) यांनी. करोडपती होण्याचं स्वप्न अनेकजणांनी उराशी बाळगलं आणि नवाथे यांचं ते स्वप्न साकार झालं. रातोरात त्यांना एखाद्या सेलिब्रिटीइतकी लोकप्रियता मिळाली. 


ऑटोग्राफ देण्यापासून बातम्यांमध्ये नाव येण्यापर्यंत सर्वत्रच त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. पण, प्रसिद्धीच्या या वलयामध्ये त्यांना काही चाहते किंवा माणसं अशी भेटली ज्यांचे मनसुबे काही वेगळेच होते. अशा व्यक्तींमुळं हर्षवर्धन यांना हादराच बसला. 


मी कंगाल झालोय....'कौन बनेगा करोडपती'मध्ये ५ कोटी जिंकणे हे आयुष्यासाठी दु:खद ठरलं


 


सूत्रांच्या माहितीनुसार  हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. तिथं फार गर्दी होती. त्यावेळी त्यांचे मित्र जे त्यांचे अंगरक्षकही होते ते कोणा एके ठिकाणी अडकल्यामुळे नवाथे यांच्यासोबत नव्हते. त्यामुळं ते जेव्हा स्टेजवरुन खाली उतरत होते तेव्हा त्यांना त्यांचा मित्र दिसला नाही. त्यावेळी प्रत्येकजण नवाथे यांना कुतूहलानं हात मिळवत होता. तेव्हाच हाताला काहीतरी ओलसर लागल्याचं त्यांना जाणवलं. 




हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणं, त्यांनी हात मागे खेचला आणि पाहिलं तर त्यातून रक्त वाहत होतं. कोणीतरी त्यांचा हात ब्लेडनं कापला होता. त्यावेळी नवाथे यांच्यासोबत अशा घटना बऱ्याचदा घडल्या होत्या.