KBC 14 : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या शोची रंगत दिवसेंदिवस वाढत जाते आहे. या शोमधून अनेकांची स्वप्न पुर्ण झाली आहेत. स्पर्धक आपल्या मेहनतीच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत बक्षीस जिंकत आहेत. नुकत्याच या शोमध्ये रजनी मिश्रा या स्पर्धकाने उपस्थित दर्शवली होती. परंतु त्यांचे एक उत्तर चुकल्याने त्यांनी 75 लाख गमावले आहे. (kbc participants looses 75 lakh after giving wrong answer see what is the correct one)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होता प्रश्न? 


प्रश्न-उत्तर मालिकेच्या सुरुवातीपासूनच रजनी यांनी 25 लाखांपर्यंतच्या प्रश्नांची मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे दिली पण 50 लाखांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर रजनी गोंधळल्या आणि त्यांना प्रेक्षकांच्या पोल लाईफ लाइनचा आधार घ्यावा लागला. हा टप्पा पार करून त्या थेट 75 लाखांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. माकडांशी संबंधित 75 लाखांच्या या प्रश्नावरही रजनी गोंधळलेल्या अवस्थेत होत्या म्हणून त्यांनी शेवटची उरलेली लाईफ लाइन वापरली आणि त्यांच्या एका मित्राला फोन केला परंतु तेही त्यांना मदत करण्यात असफल झाले. 


माकडांमध्ये मंकीपॉक्सची पहिली केस कोणत्या शहरातील प्रयोगशाळेत आढळून आली?


अ) जोहान्सबर्ग


ब) क्वालालंपूर


क) टोकियो


ड) कोपनहेगन


या प्रश्नाचे अचूक उत्तर रजनी यांना जोहान्सबर्गला वाटले. पण या प्रश्नाचे अचूक उत्तर कोपनहेगन आहे.


रजनी मिश्रा गेल्या एक वर्षापासून केबीसीसाठी प्रयत्न करत होत्या पण यश मिळत नव्हते. दरम्यान त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि आता नशीबाने त्यांना हॉट सीटवर बसवले. त्यांना ऑडिशनसाठी कोलकाता येथे बोलावण्यात आले होते. ऑडिशननंतर रजनी मिश्राने कमी वेळात उत्तरे देऊन हॉट सीटचा मान जिंकला. 



त्यांनी आराहच्या वीर कुंवर सिंग विद्यापीठातून बीएड आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रजनी मिश्रा यांचे सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातून झाले पण लग्नानंतर उच्च शिक्षण आराह शहरातूनच घेतले. त्यांनी वीर कुंवर सिंग युनिव्हर्सिटी ऑफ अराहमधून मानसशास्त्रात बीएड आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचे पती गोपाल तिवारी सध्या RITES मध्ये वरिष्ठ अभियंता आहेत आणि सध्या दुर्गापूर येथे राहतात. ते मुळात आराह शहरातील पाकपी येथील रहिवासी आहेत. रजनी मिश्रा या मूळच्या आराहच्या आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.