कोचीन : बॉलिवूड अभिनेत्री आणि एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओन हिला पाहण्यासाठी हजारो जण जमा झाले होते... यासाठी पोलिसांचा मार खाण्याचीही त्यांची तयारी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोचीनला दाखल झाली होती. यावेळी रस्त्यावर एकच गर्दी पाहाला मिळाली. यामुळे ट्राफिक कंट्रोल करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.


गर्दी काही ऐकण्याचं नाव घेईना तेव्हा पोलिसांना काठीचाही वापर करावा लागला... पण, मागे हटतील ते सनीचे फॅन्स कसले... 



फॅन्सनं मार खाल्ला पण मागे हटले नाहीत... त्यामुळे शेवटी नाईलाजानं सनीला इथून काढता पाय घ्यावा लागला. 


'कोचीनच्या जनतेचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी मिळालेल्या प्रेमासाठी आभार व्यक्त करते. गॉडस ओन कंट्रीला मी कधीही विसरू शकणार नाही. धन्यवाद केरळ' असं ट्विट यानंतर सनीनं केलं.