सस्पेन्स, क्राईम, थ्रिल... द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video
Upcoming Web Series on Hotstar: वादाची किनार असलेलला `द केरला स्टोरी` (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Kerala Crime Files on Hot Star: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने (The Kerala Story) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपटाच्या यशाला वादाचा किनारा नक्कीच लाभल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. धर्मांतर केलेल्या चार महिलांची कथा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलीये, या महिलांना आयसीस (ISISI) सारख्या दहशतवादी संघटनामध्ये सामील केलं जातं. या चित्रपटामुळे दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले होते. त्यामुळे आजही हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
केरला क्राईम फाईल्स (Kerala Crime Files) नावाची सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केरला क्राईम फाईल्स ही वेब सिरीज प्रदर्शित केली जाणार आहे. गुन्हेगारी विश्वातील दाहकता दर्शवणारी ही वेब सिरीज (Web Series) अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. सेक्स वर्कर्सची होणारी हत्या या विषयावर वेब सिरीजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. ही मालिका मल्याळम, तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठी यासह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा - Netflix वरील मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' सहा Web Series एकट्यातच पाहा!
लॉजच्या खात्यात नोंद करण्यात आलेल्या सेक्स वर्क्सची अचानक हत्या होते. दिवसेंदिवस हे प्रकरण किचकट होतं. पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागतात. त्याचवेळी पोलिसांना सापडतो, एक क्ल्यू... तिथून सिरीजची कथा फिरते. पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा निश्चय करतात आणि कहाणीची थ्रिल (Triller Web Series) सुरू होतो.
दरम्यान, केरला क्राईम फाईल्स वेब सीरिजमध्ये लाल आणि अजू वर्गीज हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. क्राईम, सस्पेन्स, थ्रिलने खचाखच भरलेली ही वेब सिरीज कधी पहायला मिळते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याच्या रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, पण येत्या 2 आठवड्यात याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकेल.