कोची: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अभिनेत्यानं आत्महत्या केली की हत्या झाली असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. राहत्या घरात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा मृतदेह आढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रिय मल्याळम टीव्ही अभिनेता रमेश वलियासाला यांचं शनिवारी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडस्ट्रीतील सूत्रांनी ही माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. अभिनेता रमेश वलियासाला यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला आहे. रमेश हे दोन दिवसांपूर्वी नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगवरून परतले होते. ते मल्याळमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक सिनेमात देखील अभिनय केला होता. 



रमेश यांनी आपल्या करियरची सुरुवात महाविद्यालयातील नाटकांपासून केली होती. रंगभूमीपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास टीव्ही आणि सिनेमापर्यंत पोहोचला. त्यांनी 22 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका साकारत घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्यामुऴे मल्याळम टीव्ही आणि सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.