मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा नवा सिनेमा 'केसरी' चा फस्ट लूक लाँच झाला आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार एका बहादूर सिख असल्याचा दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षयसोबत संपूर्ण सिख सेना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या खास मुहूर्तावर पोस्टर लाँच करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केसरी' च्या या पोस्टर लूकमध्ये अक्षय कुमारने डोक्यावर एक भली मोठी पगडी घातली आहे. त्याच्यासोबत इतर साथीदार देखील आहेत जे खेळण्याच्या मूडमध्ये आहेत. अक्षयने या पोस्टरमधून सारागडीच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केसरीच्या पोस्टरला लाँच करताना अक्षय म्हणाला की, मेरी पगडी भी केसरी... जो बहेगा वो लू भी केसरी.. और मेरा जवाब भी केसरी.... 



अक्षय कुमारचा केसरी हा सिनेमा पीरियड सिनेमा आहे. या सिनेमांत अक्षय कुमारसोबत परिणीति चोप्रा दिसणार आहे. या सिनेमाला करण जोहरने प्रोड्यूस केलं आहे. या सिनेमाचं पोस्टर खास दिवशी रिलीज केलं आहे.