दारुचे शौकीन आहात? फक्त लिवरच डॅमेजच नव्हे; कॅन्सरसह 'या' 6 आजारांना देता आमंत्रण

दारुचं सेवन हे शरीरासाठी घातक असतं. यामुळे शरीराचे अनेक आजार होतात. ज्यामध्ये कॅन्सरचा धोका देखील अधिक असतो. दारुमुळे कोणते आजार होतात. जाणून घ्या 

| Sep 30, 2024, 09:18 AM IST

दारुचं सेवन हे शरीरासाठी घातक असतं. यामुळे शरीराचे अनेक आजार होतात. ज्यामध्ये कॅन्सरचा धोका देखील अधिक असतो. दारुमुळे कोणते आजार होतात. जाणून घ्या 

1/7

Alcohol Causes Cancer: मद्यप्राशन करुन शरीराला कोणत्याही पद्धतीचा फायदा होता. पण त्यामुळे तब्येतीवर विपरित परिणामच होतो. स्ट्रेज मॅनेज करण्यासाठी दारुचे सेवन करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ कधीच देत नाही. पण दारु प्यायल्यामुळे फक्त लिवरच डॅमेज होत असं नाही तर कॅन्सरसह 6 आजारांना आपण आमंत्रण देतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) च्या म्हणण्यानुसार नियमित किंवा कधी कधी दारुचे सेवन केल्यास कॅन्सरसह 6 जीवघेण्या आजारांची शंका मोठ्या प्रमाणात बळावते. 

2/7

तोंडाचा कॅन्सर

दारुमुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते. अभ्यासात म्हटलं जातं की, जे लोक दारुचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये कॅन्सरची शक्यता दुप्पटीने वाढते. यामध्ये अनेकदा ओठ, गाल किंवा जीभेचा कॅन्सर होतो. 

3/7

गळ्याचा कॅन्सर

गळ्याच्या कॅन्सर होण्यामागे मुख्य कारण दारु आहे. कॅन्सर हा गळ्याच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतो. यामध्ये लाळेचे ग्रंथी आणि आवाजाच्या नलिकेवर देखील याचा परिणाम होतो. दारुचे सेवन केल्यामुळे गळा आणि त्यातील नलिका अधिक संवेदनशील होतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. 

4/7

अन्ननलिकेमध्ये कॅन्सर

दारुचा परिणाम अन्ननलिकेवरही होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमितपणे दारु पितात. त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होतो किंवा ते होण्याचा धोक अधिक असतो.   

5/7

ब्रेस्ट कॅन्सर

महिलांमध्ये देखील दारुचे सेवन केले जाते. अशावेळी महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होण्याची जोखीम अधिक असते. संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्या महिला नियमित दारुचे सेवन करतात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका अधिक असतो. 

6/7

लिवर कॅन्सर

लिवर कॅन्सरचा धोका दारुच्या सेवनाने वाढतो. खूप दिवस दारुचे सेवन केल्यास लिवरला सूज आणि इतर समस्या जाणवतात. यामुळे कॅन्सरचा धोका देखील अधिक असतो. 

7/7

कोलोरेक्टल कॅन्सर

दारुचे सेवन केल्यास कोलोरेक्टल कॅन्सरचा विकास होण्याची दाट शक्यता असते. अनेक अभ्यासांमधून हे संकेत दिले आहेत. जे लोक दारु पितात त्यांना आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.