मुंबई : सोशल मीडिया असं एक माध्यम आहे, ज्यावर प्रत्येक जण कोणत्याही विषयावर आपले मत मांडू शकतो. पण शरद पवारांविरोधात वादग्रस्त पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला भोवलं आहे. शरद पवारांविरोधात पोस्ट केल्यामुळे केतकीला शनिवारी अटक करण्यात आली. आज केतकीच्या केसची सुनावणी ठाणे कोर्टात झाल्यानंतर अभिनेत्रीला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त शरद पवारचं नाही तर याआधी देखील केतकीने अनेकदा वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. ज्यामुळे केतकी वादाच्या भोवऱ्यात अडकली. केतकीने एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. ज्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख
छत्रपती शिवाजी महाराजांचा 'एकेरी' उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला. तेव्हा अग्रिमाने माफी देखील मागितील. पणअभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. 



केतकीच्या पोस्टमळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. एवढंच नाही तर केतकीने एका पोस्टमध्ये विविध-धर्म पंथांचा उल्लेख करत लिहिलं होतं.  “नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” असा आरोप केतकीने केला होता.. त्या पोस्टनंतर देखील केतकी टीकेचा सामना करावा लागला होता. 



दरम्यान, ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव -जडेजा यांच्यासमोर केतकी केसची सुनावणी झाली. केतकी चितळे हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केतकी हिने केलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.