Ketki Chitale: दोन महिन्यांपुर्वी केतकी चितळे हे प्रकरण बरेच गाजले त्यावर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया या येतच होत्या. त्यातून केतकीला मात्र फार काहीसाच फरक पडला नसल्यासारखे केतकीने दाखवले होते पण जेव्हा केतकीची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा मात्र केतकीचे सर्वत्र कौतुक झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतकीने यापुर्वीही अनेक तमाशे केले आहेत. त्याने वेगवेगळे विषय उपसून नवा ड्रामा दरवेळेस केला आहे. त्यामुळे सध्या होणारी तिच्यावरील टीका ही फार काही नवीन नसून यापुर्वी तिने केलेल्या ड्रामामुळे तिच्यावर अनेक जण रोष धरून असतात.  


१४ मे रोजी केतकी चितळे हिने एक कॉन्ट्राव्हर्शल पोस्ट लिहीली होती ज्यामुळे तिला फार मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. केतकी चितळे सुटल्यानंतर तिच्या अनेक मुलाखती झाल्या त्या सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. सध्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी पुन्हा एकदा एक नवा वाद उपस्थितीत केला आहे. 


नुकताच सर्वोेच्च न्यायालयाने ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना उत्तर प्रदेशातील सर्व गुन्ह्यांत बुधवारी जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांची सुटकाही करण्यात आली. या निकालानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की झुबेर यांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय का.. असं केतकीचे म्हणणे असून तिने याच संदर्भात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. 


सध्या तिने उपस्थित केलेल्या याच व्हिडीओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तिच्यासाठीदेखील अनेकांनी आवाज उठल्याचे पाहायला मिळते आहे. जो प्रश्न केतकीने उपस्थित केला आहे तोच प्रश्न तिला सपोर्ट करणाऱ्यांनीही केला आहे. 


भारतातील सर्व नागरिकांसाठी कायदा समान नाही का.. किमान तिला न्यायव्यवस्थेकडून योग्य न्याय मिळायला हवा, असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.  करत आहेत.