RIP Puneeth Rajkumar: पुनीतचं अंतिम दर्शन करण्यासाठी पोहोचला KGF 2 सुपरस्टार यश
भारतीय चित्रपटसृष्टीला शुक्रवारी मोठा धक्का बसला.
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीला शुक्रवारी मोठा धक्का बसला. कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांनी ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. पुनीत यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
पुनित यांच्या पार्थिवावर आज किंवा उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी त्यांचे पार्थिव स्टेडियममध्ये ठेवण्यात आले आहे.
पुनीत राजकुमार या जगात नाही हे समजताच हॉस्पिटलबाहेर लोकांची गर्दी झाली. हॉस्पिटलबाहेर पुनीत राजकुमारच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. केजीएफचा सुपरस्टार यशही पुनीतच्या शेवटच्या दर्शनासाठी पोहोचला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.
पुनीतची मुलगी परदेशातून येणार आहे. पुनितचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी स्टेडियममध्ये ठेवण्यात आले आहे. कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी पुनीत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.