साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर
Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतात सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. आता सिनेमाला भाषेचं बंधन नाही. पॅन इंडिया सिनेमे तयार होऊ लागले आहेत. साऊन इंडियन सिनेमांनी नॉर्थमध्ये खूप चांगली कमाई केली आहे. मात्र हिंदी सिनेसृष्टीची अशी तक्रार आहे की, त्यांचे सिनेमे साऊथमध्ये मात्र तेवढे चालत नाही. काही दिवसांपूर्वी सलमान खानने ही गोष्ट सांगितली होती.
सलमान खान एका प्रोग्राममध्ये म्हणाला की, साऊथ सिनेमे हिंदी प्रेक्षकांच्या पसंतीला पडतात. या सिनेमांची बक्कळ कमाई होत आहे. मात्र बॉलिवूड सिनेमांना साऊथमध्ये तेवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही. सलमान खानच्या या प्रश्नाला केजीएफ अभिनेता Yash ने उत्तर दिलं आहे.
यशने बॉलिवुड लाइफशी बोलताना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यश म्हणतो, 'असं काही नाही. आमच्या सिनेमांना कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र झालं असं की, आमच्या सिनेमांचे डब्ड वर्जन खूप चालले. यामुळे लोकांना आम्ही नेमकं काय करतो? हे कळू लागलं. सुरुवातीला आमच्या सिनेमांची आणि कामाची खिल्ली उडवली जायची. याचं कारण म्हणजे सिनेमांच खराब डबिंग. आमच्या सिनेमांकडे तेवढं लक्ष दिलं नाही. मात्र हळू हळू लोक आमचे सिनेमे समजू लागले. आमचे सिनेमे प्रेक्षकांच्या पंसतीला पडू लागले. हा बदल एका रात्रीत झालेला नाही. याकरिता बरीच वर्षे गेली. प्रेक्षक साऊथ सिनेमांचे संदर्भ समजू लागले. यामुळे आम्ही मोठ्या लोकांशी जोडले गेलो. याचं क्रेडिट प्रभास आणि राजामौली यांना जातं. KGF च्या कर्मशिअल यशानंतर आता KGF2 हा सिनेमा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे.'
साऊथमध्ये बॉलिवुड सिनेमे कसे चालतील? या प्रश्नावरही यशने उत्तर दिलं आहे.
यश म्हणाला की, 'ज्याप्रमाणे आमचे सिनेमे तेथे पोहोचली, अगदी तसेच सिनेमे येथे येणे अपेक्षित आहे. कारण संस्कृतीचा खूप मोठा फरक आहे. आमच्या संस्कृतीशी जोडले जाऊन त्याला समजून सिनेमे तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून साऊथचे लोक देखील बॉलिवुड सिनेमांशी रिलेट करु शकतात. असे अनेक नॉर्थ इंडियन सिनेमे आहेत जे साऊथमध्ये खूप चालले. सलमान सरांच म्हणणं बरोबर आहे की, नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाहीत. मात्र त्यांच्यात खूप ताकद आहे. त्यांना फक्त संस्कृतीशी कसं जोडता येईल याचा विचार करायला हवा. आम्हाला सगळ्यांनाच हिंदी सिनेमे पाहायला आवडतात.
यशच्या KGF 2 या चित्रपटाने देशभरात प्रचंड कमाई केली. तेव्हापासून यशने कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नव्हती. नुकतेच त्याने आपला सिनेमा Toxic बद्दल माहिती जाहीर केली. यामध्ये यशसोबत करीना कपूर काम करत असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘मूथॉन’ फेम गीतू मोहनदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय यश नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्येही काम करणार आहे. यामध्ये तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच 'सालार'च्या प्रमोशनदरम्यान प्रशांत नीलने KGF 3 बनवण्याबाबतही चर्चा केली होती.'