`खतरों के खिलाडी 11`मध्ये निक्की तांबोळी आणि वरुण सूदवर थर्ड डिग्री अत्याचार
`खतरों के खिलाडी 11` हा शो आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे.
मुंबई : 'खतरों के खिलाडी 11' हा शो आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. हा शो जसजसा पुढे जात आहे. तसतसा तो अधिक मनोरंजक होत आहे. जिथे गेल्या आठवड्यातील स्पर्धकांमध्ये मेडलवरुन भांडण झालं होतं. यावेळी अत्याचार वीक आहे. म्हणजेच स्पर्धकांवर दुहेरी अत्याचार केले जाणार आहेत. टास्कआधी छळ आणि टास्क दरम्यान छळ. या अत्याचाराचे बळी निक्की तांबोळी आणि वरुण सूद आहेत. कसं ते जाणून घेवूयात.
निक्की तांबोळी आणि वरुण सूदचा डान्स
यावेळी अत्याचार सप्ताह आहे म्हणजे स्पर्धकांना दुप्पट त्रास दिला जाणार आहे. शोचा एक प्रोमो व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये निक्की तांबोळी आणि वरुण सूद बर्फाच्या एका मोठ्या टाकीत उभे असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरही बर्फाळ पाणी ओतले जात आहे. या दोघांना टिप-टिप बरसा पानी या गाण्यावर नाचण्यास सांगितलं जातं. आता पुढे काय होते. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया
निक्की तांबोली पुन्हा शोमध्ये आली आहे
पहिल्या एपिसोडनंतर निक्की तांबोळीला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण ती तिसऱ्या आठवड्यात पुन्हा शोमध्ये परतली आहे. तिला या शोमध्ये आणखी एक संधी देण्यात आली आहे. मात्र, ती येताच तिने सिद्ध केलं की, ती कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संधीचा फायदा घेईल आणि हार मानणार नाही. अभिनव शुक्लासोबत केलेल्या कार्यात तिने आपलं संपूर्ण आयुष्य वाहून दिलं आणि स्वतःला भीतीच्या जाळ्यातून वाचवलं आणि अभिनवलाही वाचवलं. शनिवारचा एपिसोड खळबळजनक होता, पण रविवारचा एपिसोड देखील जबरदस्त असणार आहे. ज्यामध्ये स्पर्धक भीतीचा सापळा टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील.