मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या दरम्यान फिल्म इंडस्ट्रीमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता रंजीत चौधरी यांच वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. १५ एप्रिल २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजित चौधरी यांच निधन कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बॉलिवूडबरोबरच रणजीत यांनी हॉलिवूडमध्ये देखील आपलं नशिब अनुभवलं होतं. हॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेता रंजीत चौधरी यांच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचं झालं तर बासु चॅटर्जी यांच्या 'खट्टा मीठा' सिनेमात त्यांनी डेब्यू केला होता. या सिनेमात त्यांनी अभिनेता अशोक कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमांतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांनी पसंत केला होता. तसेच 'बातों बातों मे' आणि 'खुबसुरत' सिनेमातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.



आतापर्यंत त्यांनी ४० सिनेमांत भूमिका साकारली आहे. तसेच कॉमेडी रोलमध्ये दिसून आले आहेत. सिनेमासोबतच रणजीत चौधरी यांनी टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केलंय. 'खुबसुरत' सिनेमातील जगन गुप्ता हे त्यांच कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 



रणजीत चौधरी हे लोकप्रिय अभिनेत्री पर्ल पदमसी यांचे मुलगे. पर्ल यांच्या पहिल्या लग्नानंतर रणजीत यांचा जन्म झाला. रोहिणी चौधरी ही त्यांची सख्खी बहिण. पर्ल यांनी नंतर एडमॅन एलेक पदमसी यांच्यासोबत लग्न केलं. रॅल पदमसी ही रणजीत यांची सावत्र बहिण त्यांनीच रणजीत यांच्या निधनाची माहिती दिली.