महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा असताना का नाकारला? Nitin Gadkari म्हणाले...
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांना याविषयी प्रश्न विचारता त्यांनी याविषयी त्याचं मत मांडलं आहे.
Nitin Gadkari : राज्याच्या राजकारणाविषयी बोलायचे झाले तर त्याच काहीना काही होतच राहतं. 2019 मध्ये भाजपा-शिवसेना युती त्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेचे दोन गट आणि आता 2023 मध्ये राष्ट्रवादीचे दोन गट... अशा अनेक गोष्टी घडत असल्याचे आपण पाहतो. या सगळ्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात नुकतीच नितीन गडकरी यांनी हजेरी लावलेली होती. तर एक वेळ होती जेव्हा चर्चा होती की नितीन गडकरी मुख्यमंत्री होणार. खरंतर नितीन गडकरी यांना एकदा पक्षानं मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. ज्यावेळी त्यांना ही ऑफर मिळाली होती तेव्हा ते केंद्रीय परिवहन मंत्री होते. मग नितीन गडकरी यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरला नकार का दिला याविषयी सांगितले आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावेळी नितीन गडकरी हे त्यांना पक्षानं दिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफर विषयी सांगितले. अवधुत गुप्तेनं नितीन गडकरी यांना यावेळी प्रश्न विचारला की "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर निर्विवादपणे तुमचा दावा होता, तुम्ही मुख्यमंत्री होणार असं सर्वांना वाटत होतं, पण तुम्ही अचानक माघार का घेतली?" त्यावर उत्तर देत नितीन गडकरी म्हणाले, “मी तेव्हा भाजपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, मला दिल्लीला जायची इच्छा नव्हती. पण परिस्थिती अशी झाली की मी भाजपाचा अध्यक्ष झालो आणि मला दिल्लीला जावं लागलं. एकदा दिल्लीला गेल्यानंतर मग मी ठरवलं की आता महाराष्ट्रात परत यायचं नाही.” नितीन गडकरी यांचं हे वक्तव्य ऐकताच अवधुत गुप्ते म्हणाला की याला नाराजीची किनार आहे का? याशिवाय नितीन गडकरी यांनी टोल आणि रस्ते यावर देखील वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा : अभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'
गडकरी काय म्हणाले पाहा :
दरम्यान, अवधूत गुप्ये याच्या या कार्यक्रमा विषयी बोलायचे झाले तर यात अनेक राजकारणी लोकांनी हजेरी लावली होती. सगळ्यात आधी या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीनं झाली. त्यांच्यानंतर या कार्यक्रमात संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नारायण राणे आणि श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली.