मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर दोन्ही मुलींच आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपल्या डेब्यू फिल्म धडकच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. जान्हवीच्या पाठोपाठ आता खुशी कपूर देखील आपल्या करिअरकडे वळली आहे. मात्र हल्लीच खुशी कपूरचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशी कपूर , एका मिस्ट्री बॉयसोबतचे तिचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. खुशीने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर घातलेले आहे आणि तिच्या हातात जॅकेट आहे.



खुशी कपूर वांद्रे येथे दिसली आहे. त्या हातातील जॅकेटने खुशी चेहरा लपवताना दिसत आहे. या फोटोंतून स्पष्ट होतंय की खुशी आणि हा मिस्ट्री बॉय काय पहिल्यांदा भेटत नाही. 



या काळ्या जॅकेटने खुशी स्वत:चा चेहरा लपवताना दिसतेय. हसत हसत खुशी या मिस्ट्री बॉयला भेटले, त्याच्याशी बोलते, त्याला मिठी मारते आणि मग निघून जाते, असे या फोटोत दिसतेय. मध्यंतरी खुशी मॉडेलिंगमध्ये येणार अशी चर्चा  होती. खुशीला इंटरनॅशनल मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे आहे. तूर्तास खुशी आपले शिक्षण पूर्ण करतेय.



पण ते पूर्ण होताच खुशी मॉडेलिंगच्या ट्रेनिंगसाठी विदेशात जाऊ शकते, असे या वृत्तात म्हटले गेले होते. तसे पाहता खुशीसाठी मॉडेलिंगचे जग नवे नाही. यापूर्वी अनेकदा खुशीने मॉडेलिंग केले आहे.  निधनाच्या काही दिवस  आधी श्रीदेवी खुशीसोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा  सगळ्यांच्या नजरा खुशीवरचं खिळल्या होत्या. तिच्या या लुकचे सर्वाधिक कौतुक झाले होते.