मुंबई : बॉलिवूड स्टारकिडचा एकत्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आर्चीज या सिनेमातून अनेक स्टारकिड्स एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सिनेमा येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच  5 डिसेंबर रोजी आर्चीजसाठी एक विशेष स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी या स्टारकिड्सचे पालकही तिथे उपस्थित होते. या दरम्यान चित्रपटातील स्टार्ट्स त्यांच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये आले होते. मात्र या सगळ्यादरम्यान पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी खुशी कपूरसोबत श्रीदेवी दिसल्या हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हो हे खरंय कारण यावेळी खुशीने असं काही केलं आहे. ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. मल्टीस्टारर सिनेमा द आर्चीजच्या स्क्रिनिंगला खुशी कपूरने तिच्या आईला वेगळ्या पद्धीतीने तिच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. खरंतर पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला खुशीनं आईचाच एक ड्रेस या कार्यक्रमासाठी  निवडला होता. यावेळी ती रेड कार्पेटवर आली आणि एका क्षणासाठी सर्वांनाच श्रीदेवीच तिथं आल्या असं वाटलं. पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनींगच्या वेळी आईच्या आऊटफिटला पसंती देत खुशीनं तिलाही आपल्या या महत्त्वाच्या क्षणाचं साथीदार करून घेतलं होतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


काही वर्षांपूर्वी तिच्या आईने श्रीदेवी यांनी हाच आकर्षक गोल्डन गाऊन  परिधान केला होता. तर नुकतीच खुशी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर  येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये, खुशी कपूरनने श्रीदेवीने परिधान केलेला तोच गाऊन परिधान करून आली होती.  2013 च्या IIFA रेड कार्पेटवर श्रीदेवी यांनी हाच गाऊन परिधान केला होता.


खुशीचे या  गाऊनमधील फोटो तिची डिझायनर प्रियंका कपाडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केले आहेत. खुशीचा पाठमोरा फोटो शेअर करत या डिझायनरने लिहीलं आहे की, "तिच्या आईच्या वॉर्डरोबमधील अतिशय खास ड्रेसमध्ये एक अतिशय खास नाईट."



या खास स्क्रिनिंग नाईटमध्ये खुशीसोबत तिची बहिण जान्हवी कपूर अंशुला कपूर आणइ अर्जुन कपूरसोबत तिचे वडिल बोनी कपूरदेखील सहभागी झाले होते. याचबरोबर तिची चुलत बहिणी रिया कपूरदेखील सहभागी झाली होती.   रिया कपूर तिचा पती करण बुलानीसोबत रेड कार्पेटवर दिसला.