मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीचं  ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा एका कारणामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे ते म्हणजे.. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेलं कियाराचं नातं. पण किआराच्या एका पोस्टवर सिद्धार्थने कमेंट केल्यानंतर ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दरम्यान ब्रेकअपच्या चर्चा रंगत असताना सिद्धार्थ आणि किआराला एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं 'भूल भुलैया 2' सिनेमाच्या स्क्रिनिंगमधे सिद्धार्थ मल्होत्रा देखील हजर होता. तेव्हा किआराला पाहाताचं त्याने गर्लफ्रेंडला मिठी मारली. सध्या किआरा आणि सिद्धार्थचा व्हिडीओ सोशल मीडिआवर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये सिद्धार्थ सर्वांत आधी किआराला मिठी मरातो, त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनाला देखील भेटतो. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. सध्या सर्वत्र किआरा आणि सिद्धार्थच्या व्हिडीओची चर्चा होत आहे. 


व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये, 'देव दोघांच्या जोडीचं रक्षण करो....' असं लिहिलं आहे, तर अन्य युजरने 'दोघे एकत्र सुंदर दिसतात...' असं लिहिलं आहे. शिवाय किआरा आणि कार्तिकच्या जोडीला अनेकांनी लाईक केलं आहे.