मुंबई : अभिनेता वरूण धवन कायम त्याचं खासगी आयुष्य गुपित ठेवतो. जानेवारी 2021साली वरूणने लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केलं आहे. पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा कधीचं झाली नाही. नताशा आणि वरूण यांना अनेकदा पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. लग्नानंतर देखील दोघे एकत्र क्लालिटी टाईम घालावताना दिसतात. यादरम्यानचे फोटोही हे कपल सोशल मीडियावर शेअर करतात. पण आता वरुण पत्नी नताशासोबत नाही, तर दुसऱ्या मुलीसोबत बाईकवर फिरताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण ज्या मुलीसोबत फिरत आहे,  ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री किआरा आडवाणी आहे.  वरुण आणि कियाराचा 'जुग जुग जिओ' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या किआरा आणि वरुण सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. 


सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि कियारा कधी दिल्ली तर कधी मुंबईच्या रस्त्यावर बाईकने भरारी घेत आहेत. शनिवारी सकाळी वरुण कियाराला बाईकवर घेऊन बाहेर पडला आणि दोघेही मुंबईतील एका प्रसिद्ध बेकरीमध्ये पोहोचले. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


किआरा आणि वरुणचा आगामी  'जुग जुग जिओ' सिनेमा 24 जूनला प्रदर्शित होत आहे. सिनेमात दोघांशिवाय अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


दरम्यान वरुण आणि किआरा व्हिडीओ व्हायरल होताचं, अनेक चर्चा रंगू लागल्या. दोघे सिनेमासाठी एकत्र आले असून, वरुण आणि पत्नी नताशामध्ये काहीही बिनसलेलं नाही.