कियारा अडवाणीला नाही माहित दाक्षिणेतील राज्यांची नावं; `त्या` व्हिडीओवरून झाली ट्रोल
Kiara Advani South State : कियारा अडवाणीला येत नव्हती दाक्षिणात्य राज्याची नावं... राम चरण आणि राणा दग्गुबाती यांची मदत मिळूनही सांगू शकली नाही राज्यांची नावं
Kiara Advani South State : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून नेहमीच चर्चेत असते. कियारा आडवाणी सध्या चर्चेत येण्याचं कारण दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा 'नंबर 1 यारी' हा शो आहे. या शोमध्ये कियारानं अभिनेता राम चरणसोबत हजेरी लावली होती. हे दोघं या सीझनच्या सगळ्यात शेवटच्या एपिसोडमध्ये आले होते. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमधली एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून कियारा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
एका रेडिट युजरनं एपिसोडची एक क्लिप शेअर केली आहे. ज्यात राणा आणि राम हे कियाराला दक्षिण भारताविषयी काही प्रश्न विचारताना दिसतात. रामनं तिला एक प्रश्न विचारला की दाक्षिणात्य भारत म्हटलं की त्यात कोणते राज्य येतात? मात्र, कियाराच्या उत्तरानं त्यांला आश्चर्य झालं. कियारा अडवानीनं तेलंगनापासून सुरुवात केली. त्यानंतर तिनं आंध्र प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटकचं नाव घेतलं. राणाला तिला तमिळनाडूची आठवण करुन देण्यासाठी मदत केली. राणाणं तमिळ भाषा कुठून आली हे विचारलं. त्यानंतर ती केरळचा उल्लेख करायला विसरले. राणानं पुन्हा तिला मदत करण्यासाठी म्हटलं की मल्याळम ही भाषा कुठून आली? कियाराला या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. रामनं सगळ्यात शेवटी उत्तर दिलं केरळ. कियारा यावर म्हणाली, हो, मी हेच उत्तर देणार होते.
Lmao Kiara
byu/Significant-Neat-142 inBollyBlindsNGossip
ही एक जुनी क्लिप आहे, पण आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिला देशाविषयी किंवा जनरल गोष्टींविषयी काही माहित नाही यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं की देवा, सोबोची ही मुलं अशा प्रकारे त्याच्या पॉश शाळेत जास्त फी देत परतफेड करतात. भारतातल्या कोणत्याही टियर 2 शहरातल सीबीएसई शाळेतील कोणताही मुलगा किंवा मुली सगळ्या राज्यांची नावं आणि त्यांच्या राजधाणींची नावं सांगू शकतात.
हेही वाचा : मायकल जॅक्सन निधनाच्या 15 वर्षानंतरही अब्जोंमध्ये करतो कमाई! 150 वर्षं जगण्याची होती इच्छा
दुसऱ्यानं लिहिलं की मला खरंच माहित नाही की हे मुलं भारतातील मोठ्या आणि महागड्या शाळांमध्ये नेमकं काय शिकतात. म्हणजे सरकारी शाळेतील बॅकबेंचर देखील हे सगळं सांगू शकतात. हा व्हिडीओ खरंच निराशाजनक आहे. ही अभिनेत्री किती मूर्ख असू शकते. फक्त 4 राज्यांची नावं देखील सांगू शकत नाही. आणइ इतकंच नाही तर त्याच्या कोणत्या भाषा आहेत ते देखील नाही माहित हे फार वाईट आहे.