Michael Jackson : दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या निधलाना 15 वर्ष झाली आहेत. तरी आजही त्याची अब्जोंमध्ये कमाई होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं शक्य आहे. तर काही सेलिब्रेटी असतात ज्यांचं स्टारडम हे त्यांच्या निधनानंतरही कमी होतं नाही आणि तसंच काहीसं स्टारडम हे मायकल जॅक्सन हा अशाच सेलिब्रिटींपैकी एक आहे. निधनाच्या 15 वर्षांनंतर मायकल जॅक्सनचं नाव अशा सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये आहे. आता हे नेमकं कसं याविषयी जाणून घेऊया...
फोर्ब्सप्रमाणे, मायकल जॅक्सननं 2023 मध्ये 115 मिलियन डॉलरची कमाई केली. फोर्ब्सनं 2023 मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या निधन झालेल्या सेलिब्रिटींची लिस्ट बनवली होती. त्यात त्यांनी सांगितलं की जे सेलिब्रिटी आता हयात नाहीत त्यांनी 2023 मध्ये किती कमाई केली. मायकल जॅक्सनच्या आयुष्यात खूप वाद झाले. त्याच्यावर त्याच्याच दोन पुतन्यांचा लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते. त्यामुळे त्याचं नाव खराब झालं होतं. तरी सुद्धा त्याच्या स्टारडमवर किंवा कमाईवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. मायकल जॅक्सनची जेव्हा 2009 मध्ये निधन झाले, तेव्हा त्याच्यावर खूप कर्ज होतं. तर हे सगळं कर्ज त्याच्या कुटुंबानं त्याच्या कमाईतून फेडले.
मायकल जॅक्सनच्या निधनानंतर गेल्या अनेक वर्षांपासून आजपर्यंत जोरदार कमाई केली आहे. 2009 मध्ये मायकल जॅक्सनच्या निधनापासून आतापर्यंत त्यांची कमाई 2.7 बिलियन डॉलर (22 अब्जच्या जवळपास) कमावली. 2023 मध्ये रॉयल्टी ते मायकल जॅक्सनची कमाई ही जवळपास 9699.07 कोटी असल्याचं म्हटलं जायचंय.
हेही वाचा : आदित्य रॉय कपूरला कमिटमेंटची भीती? पार्टनरमध्ये हवे 'हे' गुण
मायकल जॅक्सननं सोलो करियरची सुरुवात 1971 मध्ये केली होती. त्याचं 1982 मध्ये 'थ्रिलर' एल्बम आला होता. ज्यानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. दोन दशकांपेक्षा जास्त काळ त्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्याच्या निधनानंतरही त्याची लोकप्रियता ही कमी झाली नाही. 25 जून 2009 ला त्याचं निधन झालं. निधनाचं कारणच प्रोपोफॉल आणि बेंजोडायजेपाइसारखी औषध आणि ओवरजोडमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं आणि त्यामुळे त्यानं त्याच्यासोबत तब्बल 12 डॉक्टरांची एक टीम ठेवली होती. त्याच्या खाण्यापासून सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवायचे आणि तो जे काही खायचा ते आधी लॅबमध्ये टेस्ट करायचे.