मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. या डेटिंगची चर्चा देखील खूप होते. सध्या न्यू लव बर्ड्स कियारा अडवाणी (Kiara Advani)आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्यातील अफेरची चर्चा जोर धरत आहे. (Kiara Advani gave hints affair with Sidharth Malhotra ) तसेच या दोघांचा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्डसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी कियारा सिद्धार्थ यांची भेट खास होती. 


कियाराने सिद्धार्थला पाहून असं केलं रिऍक्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कियारा आडवाणीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. रेड कार्पेटवर कियारा सिद्धार्थ पाहून आनंदी होते. त्या  दोघांची गळाभेट सध्या चर्चेचा विषय ठरली. 



एकत्र दोघे खूप सुंदर दिसत होते


या व्हिडीओत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. या दोघांमध्ये एक खास नातं असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. या दोघांची सतत चर्चा सुरू आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


'शेरशाह' सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार 'शेरशाह' सिनेमाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ सिनेमा घोषित करण्यात आला. विष्णुवर्धन यांचं दिग्दर्शन असून या सिनेमात सिद्धार्थ हिरो शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारत होता.


सिद्धार्थसोबत कियाराचं खास नातं 


कियारा अडवाणी एका मुलाखतीत तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल बोलत आहे. 'सह कलाकार म्हणून सिद्धार्थ खूप खास आहे. सिद्धार्थ खूप काम करतो. त्याचा माहिती जाणून घ्यायला आवडते. तो अगदी तसाच आहे. '