Kiara Advani Dance Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीत लागल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या सगळ्यात कियाराचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, कियाराचा हा व्हिडीओ तिच्या लग्नाच्या तयारीतील नाही तर तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाचा आहे. 
 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कियाराचा हा ड्रेस कट-आउट परिधान करत आहे. तिचा हा स्लिट ड्रेस अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. कियाराच्या जबरदस्त अशा डान्स मुव्ह्जनं चाहत्यांना वेड लावले आहे. कियाराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना तिचा डान्स आवडल्याचे सांगितले आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिले की, तू खऱ्या आयुष्यातही खूप सुंदर आहेस. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियारा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणसोबत (Ram Charan)  'RC 15' या चित्रपटातही दिसणार आहे. वरुण धवनसोबतचा (Varun Dhawan)  'मिस्टर लेले' आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा 'अदल बादल' हे चित्रपटही कियाराकडे आहेत. 


हेही वाचा : अवघ्या 9 वर्षाच्या मुलाच्या नावावरुन केलं जातंय ट्रोल... अभिनेता Chinmay Mandlekar च्या पत्नीचं ट्रोलर्स चोख उत्तर


ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तर त्यांच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम हे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात फक्त त्या दोघांचं कुटुंब आणि जवळचे मित्र हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियारानं कतरिना आणि विकीप्रमाणे लग्नासाठी रॉयल पॅलेसची निवड केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नात सुरक्षा राहणार आहे. तर त्यांच्या लग्नाच्या आधीचे आणि त्यानंतरचे सगळे कार्यक्रम हे पॅलेसमध्ये असतील.


सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नासाठी कडेकोड बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी जैसलमेरला एक सिक्योरिटी टीम पाठवण्यात येणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे जैसलमेर पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ- कियारा किंवा त्या दोघांच्या जवळच्या कोणत्या व्यक्तीनं अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही.