मुंबई : सलमान खानच्या 'किक' सिनेमाचा सिक्वेल पुढच्यावर्षी येतोय. यामध्ये गेल्या सिनेमाप्रमाणे सलमानच लीड असणार आहे. पण त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस नसणार आहे. आता या ठिकाणी दिपिका पादुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे.


पहिल्यांदाच जोडी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००७ मध्ये शाहरूख सोबत 'ओम शांती ओम' मधून दिपिकाने आपल्या करियरची सुरूवात केली.


आतापर्यंत तिने अनेक हिरोंसोबत काम केलंय पण सलमानसोबत कोणता सिनेमा केला नाहीए. ती किक २ मध्ये सलमानसोबत दिसणार असल्याची शक्यता आहे.


हिरोईनच्या शोधात 


या सिनेमात जॅकलिनसाठी कोणती भुमिका नाहीए. किक २ साठी साजिद नाडियाडवाला नव्या हिरोईनच्या शोधात आहेत.


सलमानसोबत दिपिका असेल अशी जोरदार चर्चा आहे. सलमानसोबत यााआधी काम न केलेली हिरोइन असावी अशीही साजिदची इच्छा आहे.