नवी दिल्ली : कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असले तरी आता मात्र त्याला उतरती कळा लागली आहे. यातच शो मधील एक कलाकार देखील शो सोडून जात आहे. कीकू शारदा हे आता कपिल शो मध्ये दिसणार नाही. हा शो सोडून ते कॉमेडियन जॉनी लीवर सोबत सब टीव्ही वर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेत सहभागी झाले आहेत. या मालिकेचे नाव  'पार्टनर' असे आहे. कीकू यांनी सांगितले की, "कपिल अस्वस्थ असल्याने हा शो बंद करण्यात येणार आहे." त्याचबरोबर कीकू शो मधून बाहेर पडल्यामुळे शो कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन शो बद्दल कीकू म्हणाले की, "काही आठवडे तरी मी शो कडे सहजतेने पाहण्याची पाहीन. सप्टेंबरमध्ये मी सब टीव्हीच्या नव्या शो चे शूटींग सुरु करेन. कपिलसोबत नवीन शो करण्याची माझी इच्छा होती. परंतु, सध्या सब टीव्हीच्या शो कडे लक्ष केंद्रीत केले आहे."  या मालिकेचे दिग्दर्शन परितोष पेंटर यांनी केले असून त्यात कीकू आणि जॉनी यांचा एकत्र अभिनय पाहता येईल. 


कुटुंबाला वेळ देण्यासंबंधित कीकू यांना विचारले असता ते म्हणाले, "मी नेहमीच माझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला आहे. म्हणून त्यांची काही तक्रार नसते. पण डेली सोप चालू झाल्यावर मात्र त्यांच्या तक्रारी सुरु होतील."