`बहरला हा मधुमास` गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा `या` गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ
Kili Paul and Neema Paul: सध्या परदेशी युट्यूबर्सनाही भारतीय गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. आफ्रिकन युट्यूबर्स Kili Paul and Neema Paul यांचा `बहरला हा मधुमास नवा` या गाण्यावरील डान्स तूफान व्हायरल झाला होता. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Kili Paul and Neema Paul: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'बहरला मधुमास हा नवा' या गाण्याची. या गाण्यानं सर्वत्र अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. यावेळी जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी या गाण्यावर ताल धरला आहे. या गाण्यावर बॉलिवूडपासून हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी थिरकले आहेत. आफ्रिकन युट्यूबर्स Kili Paul आणि Neema Paul यांनीही या गाण्यावर ताल धरला होता. त्याचसोबत जपानी युट्यूबर्सनही या गाण्यावर ताल धरला होता. या गाण्याचा मोठा फॅन बेस तयार झाला आहे. सध्या या गाण्याचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (Kili Paul and Neema Paul new instagram reel on hindi song hai mera dil sung by udit narayan and alka yagnik)
Kili Paul आणि Neema Paul यांचा 'बहरला मधुमास हा नवा' या गाण्यावर ताल धरला होता. आता या त्यांच्या रिलनंतर त्यांचा नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 'बहरला मधुमास हा नवा' या गाण्यावरील त्यांच्या रीलनं अक्षरक्ष: इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे त्याच्या या व्हिडीओला जगभरातून लाईक्स आणि व्ह्यूज आले होते. आता त्यांच्या या नव्या रीलनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्यांनी लोकप्रिय गायिका अलका यगनीक आणि गायक उदीत नारायण यांच्या हाय मेरा दिल या गाण्यावर ठेका धरला आहे. यावेळी त्यांनी केलेले लिप सिंक इतके खरे वाटते आहे की त्यातून खरंच असं वाटतंय की त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा - ''चित्रपट महत्त्वाचा होता कपडे नाही'' स्मिता पाटील, शबाना आझमी यांचा Cannes मधील 'तो' फोटो चर्चेत
Kili Paul आणि Neema Paul यावेळी भारतीय वेश परिधान केला होता. त्यातून त्यांनी कुर्ता पाजमा आणि कोट व निमानं शरार घातला होता. यावेळी या पेहेराव ते दोघेही खुलून दिसत होते. त्यांनी दोघांनी एकाच रंगाचे व डिझाईनचे कपडे परिधान केले होते. त्यांनी यावेळी गुलाबी आणि जांभाळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
यावेळी त्यांनी या गाण्यावर हटके डान्स केला असून हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1 कोटीहून अधिक व्हूयज लोकांनी पाहिला आहे. त्याखाली ेनेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी दिल बोले वाह वाह या गाण्यावरही याच पेहेरावात ठेका धरला आहे. या व्हिडीओला 15 लाखहून अधिक व्ह्यूज आले आहेत.