Kim Kardashian-Kanye West Divorce : अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन आणि रॅपरल कान्ये वेस्ट यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. किम कार्दशियनने (Kim Kardashian) 2021 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यावर आता कोर्टाने (Court) निकाल दिला आहे. दोघांनीही आता कायदेशीर काडीमोड घेतला आहे. किम आणि कान्ये वेस्टला चार मुलं असून त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी दोघांचीही असणार आहे. कोर्टाने कान्ये वेस्टला एक आदेशही दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किम कार्दशियनला द्यावे लागणार इतके पैसे
किम आणि कान्ये (Kanye West) यांचा घटस्फोट कोर्टाने मान्य केला आहे. किम कार्दशियनने आपल्या नावातून वेस्ट ही काढून टाकलं होतं. संपत्तीची वाटणी आणि मुलांच्या कस्टडीवरुन दोघांमध्ये वाद सुरु होते. आता कोर्टाने याचा निकालही दिला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मुलांच्या भवितव्यादृष्टीने दोघांना एकमेकांशी बोलावं लागेल. मुलांच्या शिक्षणाचा खर्च किम आणि कान्ये दोघं मिळून करतील. 


मुलं किम बरोबर रहाणार
किम आणि कान्ये चार मुलं किम कार्दशियन हिच्याबरोबरच रहाणार आहेत. मुलांच्या खर्चासाठी कान्ये वेस्टला दरमहिन्याला  200,000 डॉलर म्हणजे जवळपास 1.65 कोटी रुपये किमला द्यावे लागणार आहेत. किम आणि कान्येची मोठी मुलगी नॉर्थ ही 8 वर्षांची आहे, दुसरा मुलगा सेंट 6, मुलगी शिकागो 4, मुलगा सालम 3 वर्षांचे आहेत. 


किम-कान्येच्या लग्नाची आठ वर्ष
किम आणि कान्ये यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली. किमने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर कान्ये याच्या विरोधात होता. त्याने घटस्फटो होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले.



कान्ये वेस्टसमोर अडचणींचा डोंगर
किमबरोबर घटस्फोट झाल्याचा धक्का बसला असतानाच कान्येसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. स्पोर्टवेअर कंपनी अॅडीडसने कान्येविरोधात चौकशी सुरु केली आहे. कंपनीतल्या एका सदस्याने कान्येवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीतल्या काही लोकांना कान्ये अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचं या सदस्याचं म्हणणं आहे. 


याशिवाय ऑक्टोबर 2022 मध्ये कान्ये वेस्टने यहूदिंविरोधात एक ट्विट केलं होतं. यावर खूप वाद झाला होता. यानंतर अॅडिडस,  बलेंसीआगा, गॅप आणि वोग यासारख्या मोठ्या ब्रँडने कान्येबरोबरची पार्टनरशिप संपवली होती. यामुळे कान्येला एकाच दिवसात 16 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.