`भारतीय जेवण हे घाणेरडं`; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा `तो` VIDEO VIRAL
Kim Kardashian Says Indian Food Is Disgusting : किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो भारतात अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी आले आहेत. अशात तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ती भारतीय जेवण हे घाणेरडं असतं असं म्हणाली होती.
Kim Kardashian Says Indian Food Is Disgusting : हॉलिवूडची लोकप्रिय सेलिब्रिटी किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी खास भारतात आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी भारतीयांच्या पाहुणचाराचा आणि रिक्षाचा सफारीचा आनंद घेतला. त्या दोघींचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात किम कर्दाशियनचा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती भारतीय जेवण हे फार वाईट असतं असं बोलताना दिसत आहे.
खरंतर हा व्हिडीओ 2012 चा आहे. Keeping Up With The Kardashians या शोच्या एका एपिसोडमध्ये किम भारतीय जेवणाविषयी चर्चा करत होती. त्यावेळी तिच्यासोबत तिच्या बहिणी केंडल जेनर आणि कायली जेनर या देखील होत्या. यावेळी किमनं तिच्या बहिणींना विचारलं की तुम्ही कधी भारतीय जेवण खाल्लं आहे का? त्यावर केंडल म्हणते फार घाणेरडं असतं. किम त्यावर उत्तर देत म्हणाली, घाणेरडं असतं बरोबर ना?
जेव्हा हा एपिसोड प्रदर्शित झाला. त्यानंतर कर्दाशियन कुटुंबाला त्यांच्या भारतीय जेवणावरील कमेंटमुळे खूप ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी त्यावर कमेंट करत म्हटलं होतं की किम कर्दाशियन आणि केंडल जेनरनं भारतीय जेवणाला घाणेरडं म्हटलं, खरंच? तुम्हाला ते आवडलंच पाहिजे असं नाही, पण इतकं वाईट बोलू नये.
किम कर्दाशियनला मागावी लागली माफी?
त्यानंतर किमनं या प्रकरणात सगळ्यांची माफी मागितली. तिला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हता असं तिचं म्हणणं होतं. त्याविषयी तिच्या ब्लॉगमध्ये बोलताना किम म्हणाली, "मला माझ्या वक्तव्यातुन कोणाच्याही भावना या दुखवायच्या नव्हत्या... म्हणजे भारतीयांच्या किंवा त्यांच्या संस्कृतीविषयी काही वाईट बोलण्याचा हेतू नव्हता. ही फक्त माझी नावड आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे मला आवडत नाहीत. ... मला कोथिंबीर आणि मिरची आवडत नाही, आणि नक्कीच काही आर्मेनियन पदार्थ आहेत जे मला वैयक्तिकरित्या घाणेरडे वाटतात, पण ते इतर आर्मेनियन लोक किंवा माझ्या संस्कृतीबद्दलचे माझे मत दर्शवत नाही. माझ्या कमेंटमधून मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्या सर्वांची स्वतःची मते आणि आवड-निवड आहे आणि मी फक्त माझे मत व्यक्त करत होते."