मुंबई :  किंग खान शाहरुखचा जब हेरी मेट सेजल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयच्या टॉयलेट..एक प्रेमकथा या सिनेमाची टक्कर नको म्हणून किंग खानने हा सिनेमा एक आठवडा आधीच रिलीज केला होता. 


पहिल्या आठवड्यात या सिनेमाला ब-यापैकी यशही मिळालं. मात्र पुढच्याच आठवड्यात अक्षयचा टॉयलेट एक प्रेमकथा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि शाहरुखच्या हैरी मेट सेजलला जणू बॉक्स ऑफिसवर ग्रहण लागू लागलं. 


अक्षयची फिल्म रिलीज होताच शाहरुखच्या हैरी मेट सेजलच्या कलेक्शनवर जवळपास निम्म्याने फरक पडल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर पहायला मिळालं. 


हैरी मेट सेजलच्या जागी अनेक ठिकाणी अक्षयच्या टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाचे शो लावणंच थिएटरवाल्यांनी पसंत केलं.