मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा बॉलीवुडची क्वीन कंगणा राणावत हीच्या सोबतचा एक सेल्फी समोर आलाय. कंगनाचा 'सिमरन' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात कंगणासह मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांचीही विशेष भूमिका आहे. ती म्हणजे कंगनाच्या आईची. या आईच्या भूमिकेला वेगवेगळ्या शेड्स असून ती खूप काळजी करणारी देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशोरी शहाणे कंगणाला भेटल्या त्यावेळी त्यांना पाहून ती म्हणाली की, “इन्हें मेरी मॉम मत बनाओ, कितनी सुंदर और फिट है किशोरीजी”. या वाक्याने किशोरीजी देखील भारावून गेल्या आणि त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. 


भूमिका साकारताना देखील या मैत्रीचा फायदा झाला. या विशेष नात्याची झलक दाखवणारा हा सेल्फी. 


सध्या दहा ते बारा वर्षांनंतर किशोरी शहाणे 'जाडू बाई जोरात' या मालिकेच्या निमित्ताने विनोदी भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आवडीचं करायला मिळत असल्याने खूप एक्साईटेड असल्याचे सांगतात. मुळातच स्क्रीप्ट वाचली तेव्हाच ती भूमिका भावली. मालिकेची कथा हलकीफुलकी असल्याने प्रेक्षकांना ती पाहायला आवडेल. या मालिकेत निर्मिती सावंत माझी बालमैत्रिण दाखवली असून निर्मितीला तिच्या लेकीचं लग्न माझ्या मुलाशी करण्याची इच्छा आहे. त्यातूनच सगळी आमची होणारी तू-तू-मैं-मैं रसिकांना 'जाडू बाई जोरात' या मालिकेतून पाहायला मिळणार असल्याचे किशोरी यांनी सांगितले.