Nana Patekar Real Name: गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय अभिनेता नाना पाटेकर हे चर्चेत आहेत. सगळ्यात आधी ते 'वेलकम 3' च्या घोषणेमुळे चर्चेत आले. नाना पाटकेर घोषणा केलेल्या या चित्रपटात नव्हते. तर सध्या नाना पाटेकर हे द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा करत असताना त्यांना 'वेलकम 3' या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यांना जे वाटले ते थेट स्पष्ट सांगितलं. तेव्हा पासून नाना पाटेकर हे चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांच्याविषयी अनेक गोष्टी त्यांचे चाहते सर्च करत आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? नाना या नावानं आपल्या सगळ्यांच्या मनात राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांचे खरे नाव काही दुसरे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर यांचे खरे नाव काय हे खूप कमी लोकांना माहित आहे. चला तर जाणून घेऊया नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील अनेकांना माहित नसलेल्या गोष्टींविषयी... आज आपण नाना पाटेकर यांचं खरं नाव काय ते जाणून घेऊया... नाना या नावानं जरी सगळे त्यांना ओळखत असले तरी त्यांचं खरं नाव हे विश्वनाथ पाटेकर आहे. त्यांचं जन्म नाव हे विश्वनाथ होतं. पण जसं घरी सगळ्यांना कोणत्याही एका नावनं हाक मारतात त्याप्रमाणे त्यांना नाना म्हणायचे. त्यानंतर त्यांचे मित्र देखील त्यांना त्याच नावानं हाक मारू लागले. मग हेच नाव पुढे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना वापरलं. 


नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये झाला होता. नाना पाटेकर हे मुळेचे मुरुड-जंजीराचे आहेत. त्यांचे वडील हे चित्रकार होते. त्यामुळे नाना पाटेकरां देखील कला क्षेत्राशी आवड निर्माण झाली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकरांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी त्यांचा नाटकांशी संबंध आला आणि मग त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. या सगळ्यात नाना पाटेकर यांचा हा संपूर्ण प्रवास काही सोपा नव्हता. 


हेही वाचा : रिंकु राजगुरूचं काय बिनसलं! Instagram चं अकाऊंट पाहुन चाहत्यांना बसला धक्का


नाना पाटेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर याच महिन्यात त्यांचा 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर हे वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम.आर) माजी महासंचालक बलराम भार्गव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटात कोरोना काळात लस बनवण्याच्या शर्यतीत कशा प्रकारे भारत मदत करतो ते दाखवण्यात येणार आहे.