करण जोहरने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; बॉलिवूडची `ही` गोष्ट घातली कानावर
बॉलिवूडच्या नव्या गोष्टींची दिली माहिती
मुंबई : निर्माता करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात करण जोहरने स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षे पूर्ण होण्याचे औचित्य साधून बॉलिवूडमधील योजनांची माहिती दिली. करण जोहरने गांधी जयंतीच्या निमित्ताने मोदींना पत्र लिहून टॅग केलं आहे.
हे पत्र मोदींना टॅग करत त्याने एक नोट शेअर केली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सिनेसृष्टी एक आनंद साजरा करू इच्छिते. भारताची विरता, भारताची मुल्ये आणि संस्कृतीवर कंटेट तयार करण्याचा मानस आहे.
करणनने ट्विट करून एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गांधी जयंतीची दिवशी एका प्रेरणेने कंटेंट बनवण्याकरता एकत्र आलो आहोत. करण आपल्या या पत्रात राजकुमार हिरानी, एकता कपूर, आनंद एल राय, साजिद नाडियाडवाला, रोहित शेट्टी आणि दिनेश विजन यांना टॅग केलं आहे.
या नोटमध्ये करणने लिहिलं की, Change Within म्हणत सिनेसृष्टीत काही वेगळ्या गोष्टी करू इच्छित असल्याचं सांगितलं. खूप वेगळ्या दिशेत बॉलिवूड जात असल्याचं त्यांनी सांगितलं.