Samantha Ruth Prabhu health update : घायाळ करणाऱ्या अदा आणि भुरळ पाडणाऱ्या सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री (Samantha Ruth Prabhu) समंथा रुथ प्रभू हिनं फार कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. पाहतापाहता प्रसिद्धीझोतात आलेल्या समंथानं तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चांमध्ये स्थान मिळवलं. (South industry) दाक्षिणात्य कलाजगतातील सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) याच्या मुलासोबत रिलेशनशिप आणि त्यानंतर लग्न.... हे सर्वकाही सुरळीत असतानाच समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात वादळ आणि चार वर्षांचं वैवाहित नातं तोडण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला. (Knowning Abouth ek wife samantha ruth prabhus illness naga chaitanya might visit her)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटाच्या (Divorce) आघातातून Naga chaitannya आणि समंथा सावरत नाहीत तोच अभिनेत्रीवर आणखी एक संकट ओढावलं आणि अखेर तिनं या संकटाची वाच्यता सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून केली. आपल्याला मायोसायटीस नावाचा आजाराचं निदान झाल्याचा खुलासा समंथानं नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. (Mental health) मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टा आव्हानांता सामना करतानाच हे संकट ओढावणं किती मोठी बाब आहे हे तिच्या पोस्टमधून लक्षात आलं. 


अधिक वाचा : क्षुल्लक खेळामुळे गायकाला गमवावा लागला जीव; ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली


 


(Pushpa) 'पुष्पा' फेम अभिनेत्रीनं तिच्या आजारपणाची माहिती देताच तिच्या कलाकार मित्रांनी काळजी व्यक्त केली. समंथानं ज्या सासरच्यांशी दुरावा पत्करला त्याच कुटुंबातच्या तिच्या दिरानं अभिनेत्रीची चौकशीसुद्धा केली. इतकं सगळं होत असताना आता (Naga chaitanya) नागा चैतन्य यानंही मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार समंथाचा Ex Husband आणि त्याचे वडील, अभिनेते नागार्जुन तिची भेट घेऊ इच्छितात. जेव्हापासून समंथाच्या आजारपणाविषयी कळलं तेव्हापासून नागा चैतन्य बराच तणावाखाली असून, त्याला तिची काळजीही वाटत असल्याची माहिती अभिनेत्याच्या निकटवर्तीयांनी दिली. 


नातं तुटलं पण, मनं अजूनही जुळलेली.... 


समंथा आणि तिच्या पतीच्या (samantha ruh prabhu naga chaitanya married life) वैवाहिक नात्यात दुरावा आला असला तरीही त्यांच्यामध्ये असणारी मैत्री कायम आहे. एकमेकांना सदिच्छा देण्यापासून एकमेकांच्या कामात यश मिळावं, अशीच कामना ते सातत्यानं करताना दिसतात. त्यातच सध्याचा संवेदनशील काळ पाहता नागा चैतन्यनं बऱ्याच गोष्टी मागे सारत सॅमला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे, त्यामुळे आता आजारपणाचं निमित्त का असेना, ही जोडी एकत्र येणार.... अशीच आशा चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. 


समंथाला नेमकं काय झालंय ? (samantha disease)



समंथाला  (myositis) मायोसायटीस या आजारानं ग्रासलं आहे. आपण बरे होऊ असं सुरुवातीला वाटलेलं, पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला.... असं म्हणत सध्या आपण यातून सावरत असल्याचं समंथानं तिच्या पोस्टमधून सांगितलं. तिला झालेल्या या व्याधीमध्ये स्नायू, फुफ्फुसं आणि त्वचेमध्ये सूज येते. ऑटोइम्युन नेक्रोटायजिंग मायोपॅथीचा त्रासही यात सतावू लागतो. या आजाराची लक्षणं पाहता समंथा यातून लवकरात लवकर सावरावी अशीच इच्छा चाहते व्यक्त करताना दिसत आहेत.